सावंत, देसाई, पाटील…; उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत 9 पैकी किती खासदार उपस्थित?, A टू Z म

उद्धव ठाकरे शिवसेना यूबीटी खासदारांची बैठक मुंबईः शिवसेना ठाकरे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रविवारी (१४ जून) मुंबईतील ‘मातोश्री’ (Matoshree) निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता पक्षाच्या सर्व लोकसभा खासदारांची बैठक बोलावली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) जोरदार चर्चा सुरू असताना, या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होतं. आता या बैठकीला कोणते खासदार प्रत्यक्षात हजर राहिले, कोण ऑनलाईन जोडले गेले आणि कोण गैरहजर राहिले, याची सविस्तर माहिती समोर आली आहे. याबाबत ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत सोशल मिडीया पोस्ट लिहून माहिती दिली आहे.

Shivsena UBT Meeting : ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत 9 पैकी किती खासदार उपस्थित?

प्रत्यक्ष उपस्थित खासदार

1) संजय दिना पाटील

२)अरविंद सावंत

३) राजाभाऊ वाजे

4) अनिल देसाई

ऑनलाईन उपस्थित खासदार

१) ओमराजे निंबाळकर

२) भाऊसाहेब वाघचौरे

3) संजय देशमुख

4) संजय जाधव

५) नागेश पाटील आष्टीकर

Sanjay Raut Post: संजय राऊतांनी पोस्ट करत बैठकीबाबत दिली माहिती

संजय राऊतांनी पोस्ट करत मातोश्रवरील बैठकीबाबत माहिती देताना म्हटलं की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर लोकसभेतील सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली बैठकीत अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाझे हे उपस्थित होते. शिवाय  ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश आष्टीकर, संजय देशमुख हे खासदार व्हर्चुअली उपस्थित होते. तर संजय बंडू जाधव (परभणी) यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली, सर्व खासदार एकजूट आणि निष्ठेने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे आहेत, बैठकीत श्री.आदित्य ठाकरे उपस्थित होते आता तरी अफवांचा बाजार बंद होईल ही अपेक्षा! जय महाराष्ट्र !, अशी पोस्ट करून सर्व आमदार उपस्थित असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन ऑफलाईन बैठकीत नेमके कोणते मुद्दे मांडले

१. कर्जमाफी विरोधात आवाज उठवा… कर्जमाफी संदर्भात सरकारला प्रश्न विचारा..
2. सर्व खासदार आपल्या सोबत आहेत तुम्ही कोणाच्याही संपर्कात नाहीत… कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तो संभ्रम काही ठिकाणी दूर करा
3. महागाई कर्जमाफी शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आवाज उठवा…
4. जशी खासदारांची बैठक घेतली तशी आज जिल्हाप्रमुखांची सुद्धा झूम मीटिंग उद्धव ठाकरे घेणार आहेत
5. जिल्ह्या जिल्ह्यातील प्रश्न त्या ठिकाणची समस्या जिल्हाप्रमुखांकडून उद्धव ठाकरे जाणून घेतील
6. संघटनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा उद्धव ठाकरेंनी आजच्या खासदारांच्या बैठकीत मार्गदर्शन केलं
7. ज्या ठिकाणी खासदारांच्या संदर्भात संभ्रम आहे त्या ठिकाणी तो संभ्रम दूर करून आपण पक्षासोबत आहोत हे कार्यकर्त्यांना सांगा आपली भूमिका स्पष्ट करा असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी बैठकीत सांगितलं

Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’च्या सावटात ठाकरेंची रणनीती

ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत. त्यापैकी 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठल्यामुळे या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. जरी काही खासदार वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे गैरहजर असले, तरी ऐन बैठकीच्या वेळी शिर्डीचे खासदार वाकचौरे यांचे ‘नॉट रिचेबल’ असणे ठाकरे गटाची धाकधूक वाढवणारे ठरत आहे. आता या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित खासदारांना काय कानमंत्र देतात? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्यामध्ये शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची सुद्धा चर्चा केली जाते. आज मातोश्रीवर ठाकरेंच्या खासदारांची बैठक सुद्धा बोलवण्यात आली, परंतु माहिती अशी मिळते की काही खासदार अनुपस्थित आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावरती बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला त्याची काही कल्पना नाही. कोण येणार आहे. कोण जाणार आहे. आता बैठक झाली की कोण कोण होतं मला सांगा, कोण नव्हतं ते देखील मला सांगा म्हणजे मलाही कळेल, असंही फडणवीस म्हणालेत. एकीकडे आपण पाहत असाल तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या बैठका होतात तिकडे खासदार अनुपस्थित राहतात, दुसरीकडे आपल्या प्रदेश अध्यक्षाचा दौरा सुरू आहे, तिकडे शरद पवार गटातले आमदार आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतात, त्यावर फडणवीस म्हणाले, प्रेम आहे, ते फक्त प्रेम आहे, दुसरं काही नाहीये प्रेम आहे.(Devendra Fadnavis)

हेदेखील वाचा

Comments are closed.