एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी जातानाआमदार संजना जाधव यांना गेटवरच अडवलं, सुरक्षा रक्षकांवर संताप
आमदार संजना जाधव : विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरु आहे. जळगावमध्ये शिंदेसेनेची सर्व मतं महायुतीच्या उमेदवाराला मिळायला हवीत, यासाठी बैठक सुरु आहे. यावेळी आमदार संजना जाधव यांना नंदनवन बंगल्याच्या गेटवर अडवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. बराच वेळ अडवून ठेवल्यानं आमदार संजना जाधव सुरक्षा रक्षकांवर चागल्याच संतापल्या. संजना जाधव या कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी नंदनवन बंगल्यावर जाताना सुरक्षारक्षकांनी गेटवरच त्यांनी अडवलं. आमदार असल्याचं सांगितल्यानंतरही सुरक्षा रक्षकांकडून थांबवण्यात आल्यानं संजना जाधव संतापल्या होत्या. सध्या संजना जाधव यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
विधान परिषद निवडणुकांबाबत महायुती धर्म पाळण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातही पूर्ण ताकदीने महायुतीचा धर्म पाळा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार आणि संजना जाधव यांना दिले आहेत. दरम्यान, किशोर पाटील, संजना जाधव आणि अब्दुल सत्तार नाराज होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी युतीधर्म पाळण्याचे आदेश दिलेआहेत.
विजय थलापथी: तामिळनाडू काँग्रेसने अभिनेता विजयसोबत हातमिळवणी केली
Comments are closed.