शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर मात करण्यासाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; अरविंद सावंत, संजय राऊत आण
मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला नऊ पैकी फक्त चारच खासदार उपस्थित असल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाल्याचं सांगितलं जातंय. खासदार, भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय देशमुख आणि संजय जाधव हे दिल्लीला रवाना झाले आहेत. अशातच खासदार फुटण्याची शक्यता लक्षात घेता उद्धव ठाकरेंकचे तीन खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत हे दिल्लीला आहेत.
अरविंद सावंत ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते आहेत. त्यामुळे कायदेशीर सल्ला जर खासदार फुटत असतील तर घेतला जाऊ शकतो. त्यासाठीच स्वतः अरविंद सावंत दिल्लीला पोहोचत आहेत.
ठाकरेंचे कोणते खासदार कुठे आहेत?
भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीला रवाना
संजय देशमुख दिल्लीत
संजय जाधव दिल्लीत
खासदार संजय राऊत दिल्लीत
अनिल देसाई दिल्लीत
अरविंद सावंत दिल्लीत
संजय दिना पाटील सध्या मुंबईत्यामुळे
ओमराजे निंबाळकर पुण्यात आहेत
आष्टीकर नॉट रिचेबल ( थोड्यावेळापूर्वी मतदार संघात असल्याचा सांगितलं )
ठाकरेंचे हे सहा खासदार नॉट रिचेबल असून ते बुधवारी लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती
ठाकरेंचे हे सहा खासदार नॉट रिचेबल असून ते बुधवारी लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी ते आपल्या पाठिंब्याचे पत्रही देणार असल्याची माहिती आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर राज्यातही ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. त्यात 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये पाच खासदार अनुपस्थित होते. संजय जाधव हे परभणीमध्ये धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे अनुपस्थित राहिल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील अनुपस्थित होते.
संजय जाधवांना मंत्रिपदाचं आश्वासन?
परभणीचे खासदार संजय जाधव हे आधीपासून नाराज असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संजय जाधव यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघात मोठा निधीही देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचेवळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही त्यांच्या मतदारसंघात मोठा निधी देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. त्याचसोबत 2029 साली त्यांना तिकीट देऊन पुन्हा खासदार करण्याचा शब्दही दिल्याची माहिती आहे.
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Comments are closed.