‘ऑपरेशन टायगर’चा सस्पेन्स वाढला! शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त हुकणार; 21 जूननंतर ठाकरे गट

शिवसेनेचे ऑपरेशन टायगर: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून राबवण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिंदे गटात विलीन (Merger) होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हा विलिनीकरणाचा सोहळा 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त होण्याची दाट शक्यता होती. मात्र, काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी अद्याप शिल्लक असल्याने हा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता असून, आता 21 जूननंतर याची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या महिनाभरापासून ठाकरे गटाच्या काही खासदारांशी थेट संपर्कात आहेत. पक्षांतरबंदी कायद्याचा अडथळा टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान दोन-तृतीयांश म्हणजेच 6 खासदारांचा गट तयार करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मध्येच माध्यमांमध्ये या बातम्या लीक झाल्याने प्रक्रियेला काहीसा विलंब झाला, मात्र मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा गुप्त बैठका सुरू झाल्या. या संपूर्ण प्रक्रियेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली दरबारी महत्त्वाची भूमिका बजावली असून, खासदारांच्या दिल्ली प्रवासाची सर्व जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांभाळल्याचे सूत्रांकडून समजते.

Shivsena Operation Tiger: 21 जूननंतर अधिकृत घोषणा होणार?

ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्ष (Speaker) ओम बिर्ला यांना माहिती समोर येत आहे. मात्र, खासदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र किंवा फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळं आपल्या खासदारांविरोधात कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका, अशा सूचना ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्या नेत्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील खासदारांचा विलिनीकरणाचा सोहळा 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त होण्याची शक्यता होती. मात्र, काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी अद्याप शिल्लक असल्याने हा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता असून, आता 21 जूननंतर याची अधिकृत घोषणा होऊ शकते. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची घोषणा नेमकी कधी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Shiv Sena UBT Meeting: ठाकरे गटाच्या शिवसेनेची संसदीय दलाची आज बैठक

दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली असून, ही बैठक खासदारांच्या एकनिष्ठतेची महत्त्वाची कसोटी मानली जात आहे. आज सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत ही बैठक होणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटासोबत सहा खासदार नसल्याचा विश्वास ठाकरे गटाच्या शिवसेनेला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. आजच्या बैठकीला किती आणि कोणते खासदार उपस्थित राहतात, यावरून ठाकरे गटाची पुढील रणनीती निश्चित होणार आहे.

तसेच, सहा खासदारांपैकी दोन खासदारांनी त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केलेली नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कथित ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी ठरले आहे की नाही, याबाबत दोन्ही गटांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

‘ऑपरेशन टायगर’ची टाईमलाइन- (Shivsena Operation Tiger)

  • 10 जून- एनडीच्या बैठकीदरम्यान अमित शाह, शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा
  • अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली
  • 10 जून- शाह यांची फडणवीस, शिंदेंसोबत बैठक आणि ग्रीन सिग्नल
  • 10 जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट
  • 14 जून- उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली
  • अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर
  • नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित
  • ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर
  • 15 जून- खासदार संजय देशमुखांची दिल्लीत प्रतापराव जाधवांशी भेट
  • 16 जून- रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या, शिंदेही रवाना
  • फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
  • 17 जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजेंची पत्रकार परिषद
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र
  • ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप

ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे- (Shivsena MP List)

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

कोणते खासदार शिंदे गटात गेले? (Operation Tiger Shivsena MP)

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

आणखी वाचा

Shivsena Opration Tiger: शिंदेंकडे गेलेले 6 पैकी 2 खासदार पुन्हा येणार, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ; माघारी येण्याचं कारणही सांगितलं!

Comments are closed.