ठाकरेंना सोडणाऱ्या सहा खासदारांच्या विलिनीकरणासाठी शनिवारचा मुहूर्त, संसदेकडून घोषणा होणार

मुंबई : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरबद्दलची (Operation Tiger) आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्या सहा खासदारांनी ठाकरेंना सोडून स्वतंत्र गट निर्माण केला आहे त्यांच्या विलिनीकरणाची घोषणा संसदेकडून शनिवारी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर यसस्वी झालं असलं तरी त्याची घोषणा ही शिवसेनेच्या वर्धापणदिनानंतरच केली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

एबीपी न्यूजच्या राजकीय संपादक मेघा प्रसाद यांनी यावर बोलताना सांगितलं की, या सहा खासदारांनी त्यांच्या सह्यांचं पत्र हे लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भीती त्यामध्ये खासदारांनी व्यक्त केली आहे. हे पत्र गेल्या 48 तासांपूर्वी देण्यात आलं असलं तरी त्याची घोषणा आता लगेच करण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजे 20 जून रोजी याची घोषणा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्याच दिवशी संसदेकडून बुलेटिन जारी करण्यात येणार असून त्यामध्ये या सहा खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलिनीकरण होत असल्याचं जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे, असं मेघा प्रसाद म्हणाल्या. या वेळी लोकसभा अध्यक्ष कदाचित ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना बोलावून चर्चा करतील. परंतु अंतिम निर्णय हा लोकसभा अध्यक्षांचा असेल असं मत मेघा प्रसाद यांनी व्यक्त केलं.

Shivsena Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार फुटले

चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती.

या बैठकीला फक्त संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार हजर होते. गैरहजर खासदारांना पक्षाने नोटीस पाठवली असून 7 दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

Uddhav Thackeray On Operation Tiger : ठाकरेंचे ऑपरेशन तुडवा

त्याचवेळी फुटलेल्या 6 खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. आमच्या पक्षातून निवडून आलात तर आता राजीनामा द्या, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. तर आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार असा इशाराही राऊतांनी दिला.

Shivsena Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटल्याचा दावा?

1. संजय जाधव (परभणी)

2. संजय देशमुख (यवतमाळवाशिम)

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)

5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)

ही बातमी वाचा:

Comments are closed.