खासदार गेले असतील तर तोंड का लपवतायेत? जनतेच्या दरबारात त्यांचे काय हाल होतील, दानवेंची टीका
राजदूत दानवे: ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. असं ऑपरेशन होण्याची शक्यता मला वाटत नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं. जर खासदार गेले असतील तर तोंड लपवत का फिरतायेत? त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्ही गेलो. जनतेच्या दरबारात आल्यानंतर या खासदारांचे काय हाल होतील ते सांगता येणार नाही असा इशार देखील दानवे यांनी दिला.
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं स्पष्ट
चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. या बैठकीला फक्त संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार हजर होते. गैरहजर खासदारांना पक्षाने नोटीस पाठवली असून 7 दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. यावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही असे दानवे म्हणाले.
शेतकऱ्यांना विनशर्त कर्जमाफी व्हायला पाहिजे : अंबादास दानवे
शेतकऱ्यांना विनशर्त कर्जमाफी व्हायला पाहिजे या मागणीसाठी आज मेहकर येथे उपविभागीय कार्यालयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी म्हटलंय की ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. जर खासदार गेले असतील तर त्यांनी तोंड लपवून फिरू नये जनतेसमोर येऊन सांगावं की आम्ही हे केलं मग जनता त्यांचे काय हाल करतील हे सांगता येणार नाही अशी टीकाही त्यांनी या खासदारांवर केली.
Uddhav Thackeray On Operation Tiger : ठाकरेंचे ऑपरेशन तुडवा
त्याचवेळी फुटलेल्या 6 खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. आमच्या पक्षातून निवडून आलात तर आता राजीनामा द्या, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. तर आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार असा इशाराही राऊतांनी दिला.
Shivsena Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटल्याचा दावा?
1. संजय जाधव (परभणी)
2. संजय देशमुख (यवतमाळ– वाशिम)
3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
Comments are closed.