निंबाळकरांच्या ओमच्या पुढे ‘राजे’ शब्द लावू नका, राजे शब्द हा वाझेंच्या राजाभाऊंना शोभतोय
मुंबई : प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गावगाड्यावर जे काही संस्कार केलेत, जे रोपटे लावलंय त्याला प्रबोधनकारांच्याच नातवाने पाणी घालावं, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढावा, अशा शब्दात ‘दंगलकार’ कवी नितीन चंदनशिवे (Nitin Chandanshive) यांनी ठाकरेंचा वर्धापन दिन गाजवला. ओमदादांच्या नावाच्या पुढे आता ‘राजे’ हा शब्द लावण्याची गरज नाही, तो शब्द वाझेंच्या राजाभाऊंना शोभून दिसतोय, असंही चंदनशिवे म्हणाले.
शिवसेनेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाली असून षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह राज्यभरातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमामध्ये कवी नितीन चंदनशिवे यांनी जोरदार भाषण केलं. शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी कधीच झाला नव्हता, शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला होता. कोण आलं किंवा कोण गेलं याने शिवसेना संपणार नाही, असं ते म्हणाले.
Nitin Chandanshive On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढावा
नितीन चंदनशिवे म्हणाले की, “आदित्य ठाकरे तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढा. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गावगाड्यावर जे काही संस्कार केलेत, जे रोपटे लावलंय त्याला प्रबोधनकारांच्याच नातवाने पाणी घालावं. गावगाड्याजवळ एक हुंदका आहे, जो एका नव्या ठाकरेची वाट पाहत आहे. ती पोकळी भरून काढण्याची जबाबदारी तुमची आहे. ओरिजनल शिवसैनिक ब्रँड तयार करा.”
Nitin Chandanshive On Omraje Nimbalkar : ओमदादांच्या पुढे राजे लावू नका
यावेळी नितीन चंदनशिवे यांनी ठाकरेंची साथ सोडलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “ओमदादांच्या नावातील राजे हा शब्द काढून टाका. निंबाळकरांच्या ओमच्या पुढे राजे लावण्याची गरज नाही. राजे हा शब्द वाझेंच्या राजाभाऊंना शोभून दिसतोय. राजाभाऊंनी निष्ठावंतांना फुंकर दिली.”
स्वतःला मूल झालं नाही म्हणून शेजाऱ्याला बोलवायचं, आणि ऑपरेशन यशस्वी झालं तर तिसराच कुणीतरी पेढे वाटतोय याचं आश्चर्य वाटतंय, अशा शब्दात नितीन चंदनशिवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि भाजपवर टीका केली. 40-50 वर्षांपूर्वी शिवसेनेचा जो दरारा होता तो दरारा आता परत मुंबईतो दिवस आहे, ते म्हणाले.
नितीन चंदनशिवे म्हणाले की, “मला संजय राऊत यांनी फोन केला, त्यामुळे इकडे आलो. संजय राऊत यांनी शिवी दिली म्हणून यांनी दंगा केला. पण यांनी जी फेक अकाउंट काढून ठेवलीत ते दुसऱ्यांना शिवीगाळ करतात त्याचं काय? एक दिवस यांच्या घरातील अब्रूवर यांनी हात घातला की समजेल.”
Nitin Chandanshive Speech : देवेंद्र फडणवीसांवर टीका
आम्ही कुणाजवळ जाऊन बसावं आणि कुठून उठून जावं हे ज्याला समजलं, त्यालाच आयुष्य कळालं. उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले जे कोणी आहेत त्यांच्या वेदना आहेत, त्यांची काही कारणं आहेत. दिवसभर हे उद्धाटनं करतात आणि रात्री दार लावून रडत बसतात, असा टोला नितीन चंदनशिवे यांनी लगावला. तुम्हाला देवेंद्रचा देवा भाऊ होण्यासाठी 1500 रुपये द्यावे लागले, निवडून आल्यानंतर ते परत घ्यायलाही विसरला नाहीत, अशा शब्दात नितीन चंदनशिवे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं ही यांची वृत्ती. महापुरूषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. ती गर्दी जोपर्यंत पुस्तकांजवळ गर्दी होत नाही तोपर्यंत काही खरं नाही, असं नितीन चंदनशिवे म्हणाले. या देशाच्या संविधानाला जर साधं नख जरी लावण्याचा प्रयत्न केला तर माझा हा काळा रंग तुमच्यात मिसळून जाईल. आता ही वैचारिक भाषा कुणाला समजत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
ही बातमी वाचा:
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Comments are closed.