कोल्हापूरच्या सभेत भाषण करताना अमित शाह खुदकन हसले अन् पॉझ घेऊन म्हणाले, ‘आता शिवसेना एक झालेय,
Amit Shah and मराठी: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यासंदर्भातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. अमित शाह यांनी भाषणाची सुरुवात केली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव घेतले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांचे नाव घेताना अमित शाह यांनी एक पॉज घेतला आणि नंतर हसत त्यांनी शिंदे यांचा उल्लेख ‘शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे’, असा केला. यापुढे ते म्हणाले की, आधी एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Camp) म्हणावे लागत होते. पण आता कोणता गट उरला नाही, एकच शिवसेना उरली आहे, अशा शब्दांत अमित शाह यांनी ‘ऑपरेशन टायगर’बाबत टिप्पणी केली. (Kolhapur Politics News)
एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाचे सहा खासदार गळाला लावण्यास यश मिळवले आहे. यामध्ये संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश होता. दोन दिवसांपूर्वी या फुटीर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले जाते. याबाबत काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता बाकी असल्याने या सहा फुटीर खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ओमराजे निंबाळकर वगळता उर्वरित पाच खासदार हे सध्या राजस्थानमध्ये अज्ञातस्थळी असल्याची माहिती आहे.
Amit Shah in Kolhapur: अमित शाह भाषणात काय म्हणाले?
इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कोल्हापूरकरांना माझा राम राम. आज आपण सर्वजण एका महत्त्वाच्या कामासाठी एकत्र आलो आहोत. आज सर्व निवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास केला जात आहे. 1500 कोटी रुपयांचा अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी दिला आहे. देशभरातील भाविकांच्या स्वागतासाठी पुन्हा एकदा अंबाबाई मंदिर उभा राहील. संपूर्ण मंदिर परिसराचा विकास केला जाणार आहे, मंदिर विकास आराखडा मध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कामं पूर्ण केली आहेत. आम्ही लहान असल्यापासून अयोध्ये मधील राम मंदिराबाबत ऐकत होतो, आम्हाला देखील वाटत नव्हतं तोपर्यंत राम मंदिर होईल की नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचे काम पूर्ण केले. विकास आणि विरासत माध्यमातून काम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता रेकॉर्ड बनवला आहे. सर्वात जास्त दिवस पंतप्रधान म्हणून विराजमान होण्याचे रेकॉर्ड नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलं आहे. संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी आणि एनडीए सरकार बनत आहे. आम्हाला म्हणत होते सर्व ठिकाणी पोहोचाल, मात्र बंगालमध्ये तुम्ही पोहोचू शकत नाही. मात्र, आता बंगालच्या जनतेने किती आशीर्वाद दिला आहे. केवळ बंगालमधून नाही तर देशात कुठूनही घुसखोरी होऊ देणार नाही, असे अमित शाह यांनी म्हटले.
आणखी वाचा
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Comments are closed.