ठाकरे गट फुटला, राज ठाकरे सावध, मनसेच्या नगरसेवकांना तातडीने शिवतीर्थवर बोलावलं, नेमकं काय घडलं

राज ठाकरे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाला लागलेल्या या मोठ्या धक्क्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कमालीचे सावध झाले आहेत. या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांची आज तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’वर पार पडणार आहे.

Raj Thackeray: बैठकीचा मुख्य अजेंडा काय?

‘शिवतीर्थ’वर होणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत राज ठाकरे स्वतः उपस्थित नगरसेवकांशी थेट संवाद साधणार आहेत. मुंबई महानगरपालिका आणि पक्षांतर्गत संघटनात्मक विषय या संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. ठाकरे सेनेतील फुटीनंतर मुंबई महापालिकेत ऑपरेशन टायगर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता राज ठाकरे आज बैठकीत मनसेच्या नगरसेवकांना काय कानमंत्र देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Shivsena Operation Tiger:  ठाकरे गटाला लागलेला मोठा झटका

दरम्यान, सोमवारी ठाकरे सेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. यामध्ये संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांसारख्या बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे. या खासदारांनी थेट सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

या खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनीही पक्षाच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक नरिमन पॉईंट येथील ‘शिवालय’ कार्यालयात बोलावली होती. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पक्षाची रणनीती आखणे आणि बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा आढावा घेणे हा या बैठकीचा हेतू होता. मात्र, ठाकरे सेनेच्या विधानसभेच्या 20 पैकी केवळ 16 आमदारांनीच या बैठकीला उपस्थिती लावली. तर विधान परिषदेचे 5 आमदार उपस्थित होते. 4 आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे, जरी पक्षाकडून सर्व आमदार एकनिष्ठ असल्याचा दावा करण्यात आला असला तरी 4 आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मराठी : ‘चौकार नाही, थेट षटकार मारला’ : एकनाथ शिंदे

सोमवारी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन खासदारांचे स्वागत केले आणि हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असल्याचा दावा केला. “शिवसेना हे एक कुटुंब आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या खऱ्या शिवसेनेत हे कट्टर शिवसैनिक खासदार सामील झाले आहेत,” असे शिंदे म्हणाले. 22 जून 2022 च्या बंडाचा संदर्भ देत त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही आधी उठाव (Revolt) केला होता. त्यावेळी 40 आमदार सोबत आले होते. आता या लढ्याचा दुसरा टप्पा सुरू झाला असून आम्ही यावेळी चौकार नाही तर थेट षटकार मारला आहे,” असे त्यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

Shivsena MP Opration Tiger Vikas Nidhi: ओमराजेंनी 18 पैकी 2 कोटी खर्च केले; विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या फुटलेल्या खासदारांची बुरखा टराटरा फाडणारी माहिती

Comments are closed.