‘केतन म्हणालेला ती सारखी चिडते, तुम्ही तिची व्यवस्थित चौकशी केली का?’, मी म्हणालो आपल्याला खात
Ketan Agrawal death : पुणे : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला केतन विशाल अग्रवाल (Ketan Agarwal Death case) (वय २५) याचा मृत्यू हा अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच रचलेला पूर्वनियोजित कट होता, असे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. केतनची (Ketan Agarwal Death case) होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी त्यांच्या प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी केतनला दरीत ढकलून संपवल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ketan Agarwal Death case) सिया प्रवीण गोयल (वय २०, रा. लीलाकुंज, न्यू एरा सोसायटी, गंगाधाम समोर, बिबवेवाडी) आणि सियाचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मृत केतनच्या वडिलांनी विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना केतन आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती देखील सांगितली आहे.
Ketan Agrawal death : ती मुलगी विनाकारण कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडते…
विशाल अग्रवाल माध्यमांशी बोलताना म्हणाले, माझा मुलगा मला सोडून गेला, त्या मुलीसोबत केतनचं फेब्रुवारीमध्ये तुमचं लग्न ठरलं होतं. लग्नासाठी मुलीच्या घरच्यांकडूनच आम्हाला मागणी आली होती. आम्ही वारंवार सांगत होतो, तुमची मुलगी लहान आहे. आता वीस वर्षाची झाली आहे. एवढ्या लवकर कोण लग्न करतं, पण त्यांचं म्हणणं होतं आम्हाला तिचं लग्न करायचं आहे. त्यामुळे आम्ही मुलगी बघायला गेलो, ओळखीचे होते, नात्यातले होते, मुलगी बघून ठरवलं, साखरपुडा झाला, साखरपुडा झाल्यापासून दर आठ-दहा दिवसातून त्यांच्या काही ना काही व्हायचं, कोणत्या तरी गोष्टीवरून पोरगी चिडायची, तो वारंवार मला म्हणायचा, पप्पा तुम्ही तिची चौकशी केली आहे का? तुम्ही त्या मुलीची चौकशी केली आहे का? ती मुलगी विनाकारण कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडते आहे, मी म्हणायचो जाऊदे, आपल्या नात्यातले आहे. आपल्या पाहुण्यांचीच आहे. त्यांनी आपल्याला खात्री दिलेली आहे. त्या खात्री वरती तू काळजी करू नकोस, अशी माहिती विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Ketan Agrawal death : फक्त त्याच्या एकट्याचा पासपोर्ट चोरीला गेला होता
तर प्री-वेडिंग शूटसाठी बालीला निघाले होते, बालीला जाण्यासाठी फक्त चारच लोक गाडीत होते, ती मुलगी, तिचा भाऊ, माझा मुलगा आणि माझी मुलगी गाडीमधून त्याचा पासपोर्ट चोरीला गेला. एअरपोर्टला जाऊन चेक केलं. तर काहीच मिळालं नाही. बागेमध्ये करन्सी होती, क्रेडिट कार्ड होते, सगळं काही होतं, फक्त त्याच्या एकट्याचा पासपोर्ट चोरीला गेला होता. त्यामुळे ते बालीला जाऊ शकले नाहीत. त्यांना परत यावं लागलं, वारंवार ती मुलगी एकच म्हणायची की लोहगड किल्ल्यावर जायचं. लोहगड किल्ल्यावर जायचंय, इतकच ती म्हणायची. एकदा गेले पण दुसऱ्यांदा मी पाठवलं नाही. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा हट्ट करून बसली. माझ्या मित्रांची पार्टी आहे. आम्ही तिथे बर्थडे सेलिब्रेशन करू मला पाठवा माझी बायको सारखा म्हणायची किल्ल्यावर काही काम नाही नाही जायचं पण तिने तिने ऐकलं नाही, दोनदा ते जाऊन आल्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा हट्ट करायला लागली, १८ तारखेला सकाळी केतन लोहगडला जाण्यासाठी आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घरातून निघाला, तो तिथे पोहोचला, आणि जवळपास पाहुणे अकरा वाजता, माझ्या बायकोला त्या मुलीच्या आईचा फोन आला. तुमचा मुलगा किल्ल्यावरून खाली पडला आणि तुम्ही गडावर पोहोचा. आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही तिथे पोहोचण्याच्या आधीच पोलीस, मदतीसाठी स्थानिक लोक पोहोचले होते. त्या लोकांनी सगळी मदत केली, त्याला वरती काढून आणलं. त्यांचे खूप खूप आभार पण त्याला वरती काढल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, असंही पुढे विशाल अग्रवाल म्हणाले.
Ketan Agrawal death : ती त्याच्यासोबत फिरायला उदयपूरला देखील…
आमच्या काही लक्षातच येत नव्हतं, इतका शार्प मुलगा, असा कसा काय पडू शकतो किल्ल्यावरून, पडायचं काही कारणच नाही. इतका मोठा लोहगड किल्ला आहे. सगळीकडे रेलिंग आहे. कठडे आहेत. त्यामुळे खाली पडायचं काही कारणच नव्हतं. त्यानंतर आम्ही तिथे जाऊन दोन-तीन दिवसांनंतर पाहणी केली. तर आमच्या लक्षात आलं. तो तिथून पडू शकत नाही. आम्ही, पोलिसांनी सर्व तपास केला, त्यामध्ये खूप काही सत्य बाहेर आलं, त्या पोरीचं एका मुलासोबत प्रेम संबंध होतं. ती त्याच्यासोबत फिरायला उदयपूरला देखील गेली होती. तिचे इतर पोरांसोबत देखील अश्लील चॅटिंग आहेत. हे समजत नाही की, तिचे किती पोरांसोबत संबंध आहेत. काय आहे, काय नाही, आता सगळं तपासात निघेल. तिने त्या पोराला अठरा तारखेला गडावर बोलावलं आणि त्याला सांगितलं आमच्या केतनला धक्का मार, त्या दोघांनी मिळून माझ्या केतनला धक्का मारला. मी आता फक्त आणि सगळ्या समाजाच्या दुनियासमोर माझ्या मुलाच्या न्यायासाठी भीक मागतो आहे, त्याला न्याय मिळावा, माझा मुलगा आम्हाला सोडून गेला, त्याला न्याय मिळावा. इतकीच आमच्या अपेक्षा आहे, असं म्हणत विशाल अग्रवाल भावूक झाले.
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.