रोनाल्डोचा नाद करायचा नाय… पोर्तुगालचा उझबेकिस्तानवर ५-० असा दणदणीत विजय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोणी म्हणत होतं तो म्हातारा झाला, तर कोणी तो थकला, त्याचे पायच हलत नाहीत… अशी टीका वर्ल्ड कपमधील पोर्तुगालच्या पहिल्या सामन्यानंतर रोनाल्डोबद्दल टीका होत होती. पण रोनाल्डोचा नाद करायचा नाही, हे वर्ल्ड कपच्या दुसऱ्याच सामन्यात पाहायला मिळालं. रोनाल्डोच्या दमदार दोन गोलच्या जोरावर पोर्तुगालने उझबेकिस्तानवर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे पोर्तुगालने बाद फेरीत पोहोचण्याची आपली आशा बळकट केली आहे. दोन सामन्यांनंतर संघाकडे आता चार गुण आहेत.
रोनाल्डोचा वर्ल्ड रेकॉर्ड
दिग्गज खेळाडूचा दर्जा काय असतो हे रोनाल्डोने सामन्याच्या सहाव्या मिनिटाला दाखवत संघासाठी पहिला गोल केला. या गोलमुळे रोनाल्डोने एक ऐतिहासिक टप्पा गाठला, तो सहा विश्वचषकांमध्ये गोल करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आणि एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला.
पोर्तुगालचा गोलधडाका
सामन्याचे सहावे मिनिट सुरू असताना रोनाल्डोला उझबेकिस्तानच्या गोलपोस्टसमोर होता आणि त्याच्याकडे उत्तम पास आला. चेंडू जसा रोनाल्डोकडे आला त्यावेळी त्याने एकाही क्षणाचा विलंब न करता असा वेगवान फटका मारला की, त्याचे उत्तर गोलरक्षकाकडे नव्हते. कारण वाऱ्याच्या वेगाने हा चेंडू रोनाल्डोने मारला की, त्याची तोडच नव्हती.
रोनाल्डोने साहव्या मिनिटाला पहिला गोल केला. १७ व्या मिनिटाला नुनो मेंडेसने गोल करत पोर्तुगालची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर रोनाल्डोने ३९ व्या व्या मिनिटाला मिनिटाला सामन्यातील आपला दुसरा गोल केला. या गोलमुळे पोर्तुगालने पहिले सत्र ३-० अशा आघाडीसह संपवले. दुसऱ्या सत्रामध्ये उझबेकिस्तानचा गोलरक्षक नेमातोव्हने चुकून आत्मघाती गोल केला, ज्यामुळे पोर्तुगालची आघाडी ४-० अशी वाढली. ८७ व्या मिनिटाला राफा लिओने पाचवा गोल करून पोर्तुगालचा गगालगागत नि.लग निशित केला पहिल्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो अपयशी ठरला होता. पण दुसऱ्या सामन्यात २ गोल करत त्याने वर्ल्ड रेकॉर्ड रचला.

रोनाल्डोचा विश्वविक्रमांचा षटकार; मेस्सीलाही टाकले मागे
पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो फिफा वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. उझबेकिस्तानविरुद्धच्या दोन गोलांसह रोनाल्डो विश्वचषकाच्या सहा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गोल करणारा इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. त्याने २००६, २०१०, २०१४, २०१८, २०२२ आणि आता २०२६ अशा सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करण्याचा पराक्रम केला आहे.
अर्जेटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीनेही सहा विश्वचषक खेळले आहेत, मात्र २०१० च्या स्पर्धेत त्याला एकही गोल करता आला नव्हता. त्यामुळे सहा विश्वचषकांमध्ये गोल करणारा एकमेव खेळाडू म्हणून रोनाल्डोने वेगळा मान मिळवला आहे.
४१ वर्षे १३८ दिवसांच्या वयात दोन गोल करणारा रोनाल्डो विश्वचषकातील एका सामन्यात बहुगोल करणारा सर्वात वयस्क खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम मेस्सीच्या नावावर होता. तसेच विश्वचषकात गोल करणाऱ्या सर्वात वयस्क खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला.
पोर्तुगालचा नुनो मेंडेस हा विश्वचषकात थेट फ्री-किकवर गोल करणारा केवळ दुसरा पोर्तुगीज खेळाडू ठरला. याआधी २०१८ मध्ये स्पेनविरुद्ध रोनाल्डोने हा पराक्रम केला होता. रोनाल्डो आणखी एका दुर्मिळ यादीत सामील झाला आहे. आपल्या देशासाठी विश्वचषकात सर्वात युवा आणि सर्वात वयस्क फुटबॉलपटू होण्याचा मान मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये आता त्याचा समावेश झाला आहे. या यादीत डेन्मार्कचा मायकेल लॉड्रप आणि अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी यांचाही समावेश आहे. उझबेकिस्तानविरुद्धचा सामना रोनाल्डोचा पोर्तुगालसाठीचा २४ वा विश्वचषक सामना होता. विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत मेस्सी (२८) आणि जर्मनीचा लोथार मॅथाउस (२५) त्याच्या पुढे आहेत.
या गोलांसह रोनाल्डोने आपल्या कारकीर्दीत ४९ वेगवेगळ्या देशांविरुद्ध गोल करण्याचा पराक्रम केला. त्याच्या नावावर आता २३० सामन्यांत १४५ आंतरराष्ट्रीय गोल जागा गाले. याटेत

Comments are closed.