महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला केंद्रात अर्थखातं मिळणार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल 2026: देशाच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडल्या आहेत. विविध पक्षांतील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल (Union Cabinet Reshuffle 2026) होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध राज्यांतील प्रभावी नेत्यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तर अलिकडेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या राजकीय घडामोडीनंतर मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) या खासदारांपैकी एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP-SP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाबाबत मोठा दावा केला आहे.
Union Cabinet Reshuffle 2026: महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला केंद्रात अर्थखातं मिळणार?
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. “महाराष्ट्रातल्या भाजपच्या एका मोठ्या नेत्याला केंद्रात मोठ्या फायनान्स मिनिस्ट्रीचं पद दिल जाऊ शकतं,” असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Union Cabinet Reshuffle 2026: फुटलेल्या एका खासदाराला मंत्रिपद मिळणार
रोहित पवार यांनी पुढे बोलताना म्हटले की, “महाराष्ट्रात असा एक नेता आहे त्याच्याकडे छोटं पद आहे. जो मंत्री आहे त्याला महाराष्ट्रात एक मोठं पद दिलं जाईल. तसेच जे सहा खासदार पलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेले त्यातील एका खासदाराला मंत्रीपद मिळू शकतं.” रोहित पवार यांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी नेमक्या कोणाच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडणार? याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.
Union Cabinet Reshuffle 2026: मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, आगामी काळात केंद्र सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता सातत्याने व्यक्त केली जात आहे. विविध राज्यांतील राजकीय समीकरणे, आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्षीय संतुलन लक्षात घेऊन काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. याचबरोबर, आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) सोडलेल्या खासदारांपैकी एकाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अर्थात, या सर्व घडामोडींवर अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलात नेमकी कोणाची वर्णी लागते आणि रोहित पवार यांनी केलेले दावे कितपत खरे ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ
Comments are closed.