Ketan Agrawal Death Case : “45 वर्षांची ओळख होती म्हणून जास्त चौकशी केली नाही”; केतनच्या आजोबांनी सांगितली लग्न जमवण्याआधी केलेली ‘ती’ मोठी चूक

पुणे : आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यातील हे सगळ्यात मोठं दुःख आहे. सियासोबत केतनचे लग्न ठरवताना आम्ही खूप चौकशी केली नाही. कारण, गेल्या ४५ वर्षापासून मी तिचे आई-वडील, आजी आजोबा यांना ओळखत (Ketan Agrawal Death Case) होतो. सियाचं स्थळ माझा मेव्हणा आणि त्याची बायको घेऊन आले होते. ते नात्याने सियाचे आत्या-काका देखील होते. त्यांनीच आम्हाला सिया बाबत माहिती दिली होती. ती मुलगी शांत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. १९ जून रोजी सियाचा वाढदिवस असल्याने मी तिला भेट देण्यासाठी हिज्यांचा हार आणला होता. मात्र, त्यापूर्वीच तिने व तिच्या प्रियकराने माझे सगळे काही हिरावून घेतले, अशी भावना केतनचे आजोबा देवी अग्रवाल यांनी व्यक्त केली.(Ketan Agrawal Death Case)

त्याबरोबर केतनच्या आठवणी सांगत त्याचे आजोबा भावूक झाले ते म्हणाले, केतन माझे प्रोजेक्ट्स खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेत होता. तो माझ्या मुलाचा एकुलता एक मुलगा होता. त्या सियाला लग्न करायचं नव्हतं, तर सांगायचं होतं. आम्ही बळजबरी अजिबात केली नसती. आज झोपताना-उठताना माझ्या डोळ्यासमोर केतन येतो. मी देवाला, न्यायालयाला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एकच मागणी करतो की, आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी.(Ketan Agrawal Death Case)

Ketan Agrawal Death Case :  सियाचा भाऊ साहील अन् चेतन एकमेकांचे मित्र…

केतन अग्रवालला संपवणाऱ्या सिया व चेतनची पहिली ओळख क्रिकेट सामन्याच्या दरम्यान झाली होती. सियाचा भाऊ साहील व चेतन चौधरी हे एकत्र क्रिकेट खेळायचे. सिया तिचा भाऊ साहील सोबत क्रिकेट सामने पाहण्यास आणि खेळण्यासाठी जात असताना तिची चेतनशी ओळख झाली. त्यानंतर एका मित्राच्या दिवाळीच्या पार्टीमध्ये दोघांची पुन्हा भेट झाली आणि भेटीगाठी वाढत गेल्या, क्रिकेटच्या मैदानावर झालेली ओळख पुढे मैत्रीत आणि प्रेमसंबंधात बदलली.(Ketan Agrawal Death Case)

Ketan Agrawal Death Case :  आतापर्यंतच्या तपासात दोघांचाच हात

पुणे ग्रामीण पोलिसांचा तांत्रिक तपास योग्य दिशेने सुरू असून, काही साक्षीदार तपासले आहेत. यासह १० ते ११ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांच्या आजवरच्या तपासात सिया आणि चेतन हे दोन जण या कृत्यात सहभागी होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली (Ketan Agrawal Death Case)

Ketan Agrawal Death Case : सियाचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

सियाच्या आईने तिला मद्यपानाची सवय नव्हती, असे सांगितले असताना, सोशल मीडियावर सिया तिचा भाऊ साहील याच्यासोबत एका पबमध्ये पार्टी करताना दिसत आहे. यावेळी सियाच्या हातात मद्यसदृश पदार्थाचा ग्लास देखील असल्याचे दिसून येते. यासह सिया आणि चेतन हे दोघे एका स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना बघण्यासाठी गेलेले असतानाचा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. त्यामुळे सियाच्या आई-वडिलांना या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती नव्हती, याबाबत साशंकता उपस्थित केली जात आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.