भायखळ्यात मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या; आरोपी फैयाजने सांगितलं धक्कादायक कारण, प

मुंबई भायखळा मोहरम विषारी कॅप्सूल प्रकरण: मुंबईच्या भायखळ्यात मोहरमदरम्यान (Mumbai Byculla Muharram) उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या होत्या. या प्रकरणात आरोपी फैयाज निसार हुसैन प्रेमजी यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर आले आहेत. सूडाच्या भावनेतून फैय्याज याने मोहरमचे निमित्त साधून समाजातील मुस्लीम बांधवांना धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. (Byculla Muharram Poisonous Capsules Case)

फैयाज आणि त्याचा भाऊ या दोघांना त्याच्या पत्नींनी सोडून दिले होते. या मागे समाजातील लोकांचा मोठा हात असल्याचा समज त्यांचा होता. यातून समाजाला धडा शिकवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच महिनाभरापासून फैयाज या कटाची तयारी करत होता. यासाठी मोबाइलच्या माध्यमातून “झिंक फॉस्फाईड” औषध कंपन्या, कॅप्सूल बनवण्याची पद्धत त्यांचे साहित याबाबतची माहिती इंटरनेटवरून गोळा केली होती. फैयायजच्या मोबाईलमधून याबाबतची माहिती त्याने इंटरनेटवर सर्च केल्याचे आणि लोकांना मारण्यासंदर्भातले चॅटिंगही आढळून आले आहेत. (Byculla Muharram Poisonous Capsules Case)

पेनकिलरच्या नावाखाली ही औषध- (Byculla Muharram Poisonous Capsules Case)

भायखळा पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 5 ते 6 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहे. तर फैयाजचा मोबाईल न्यायवैद्यक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवला आहे. या साहित्यासाठी त्याने 60 ते 70 हजार रुपये गोळा केले होते. पोलिसांनी त्याच्याजवळून औषध कॅप्सूलमध्ये भरण्यासाठी वापरले जाणारे ट्रे ही जप्त केले असून एकाच वेळी 100 कॅप्सूलमध्ये ही औषध भरता येत होती. मोहरमच्या निमित्ताने भायखळा, डोंगरी, आग्रीपाडा, नागपाडा, मोहम्मद अली रोड येथे मोठ्या प्रमाणात जुलूस निघतात. यावेळी मुस्लिम बांधव प्रति प्रमाणे स्वतःला मारून घेतात. यावेळी शरीरावर होणाऱ्या जखमा यामुळे दुखणे कमी व्हावे, यासाठी त्याने पेनकिलरच्या नावाखाली ही औषध मुंबईच्या डोंगरी येथील तो थांबलेलेया हॉटेलनध्ये बनवली.

भायखळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला- (Byculla Muharram Poisonous Capsules Case)

फैय्याजकडून 14 हजारहून अधिक कॅप्सूल जरी आढळली असली, तरी त्याहून अधिक कॅप्सूल त्याला बनवायच्या होत्या, मात्र औषध संपले आणि मोहरमच्या जुलूसही दुसऱ्याच दिवशी असल्याने बनलेल्या कॅप्सूल घेऊन तो मोहरमच्या जुलूसमध्ये वाटप करू लागला. मात्र भायखळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. फैय्याज जुलूसमध्ये काही तरी गोळ्याचं वाटप करत असल्याचे निदर्शनास येताच, गस्तीवरील पोलिसांनी त्याला रोखले. गोरेगाव नेस्को, वरळी येथील कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थाच्या मृत्यूमुळे फैय्याजही तशाच प्रकारच्या गोळ्या वाटत नाही ना असा संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडले. एवढ्यात औषध घेतलेल्या काही जणांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर गोंधळ उडाला. मात्र जुलूसमध्येही भायखळा पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली. ज्या डोंगरीच्या हाॅटेलमध्ये फैयाज हा मागील पंधरा दिवसापासून थांबला होता. विशेष म्हणजे ज्या कंपनींकडून त्याने ही औषध आणि इतर साहित्य मागवली ती हाॅटेलच्याच पत्यावर मागवली होती हे तपासात समोर आले आहे.

फैयाजची मोठी बहिण इराणमध्ये डॉक्टर- (Byculla Muharram Poisonous Capsules Case)

फैयाज हा उच्च शिक्षित असून तो काही वर्षे इराणलाही नोकरीसाठी बहिणीकडे गेला होता. फैयाजची मोठी बहिण इराणमध्ये डॉक्टर आहे. तर आईही बहिणीसोबतच राहते. इराणमध्ये 4 वर्षे राहून तेथे अपेक्षित नोकरी न मिळाल्याने 2025 मध्ये फैय्याज हा भारतात आला. त्यानंतर तो भावासोबत वडिलांच्या कलर पेटींगच्या व्यवसायात त्यांना मदत करत होता. भायखळा पोलिसांच्या तपासात दहशतवादी बाबत कुठलेही फैय्याजचे कनेक्शन आतापर्यंत तरी आढळून आले नाही, मात्र तरीही फैय्याजला अन्य कोणी मदत केली का ? याचाही पोलिस शोध घेत आहेत. फैय्याजची पोलिस कस्टडी संपणार असून सोमवारी त्याला माझगावच्या 25 नंबर कोर्टात दुपारी हजर केले जाणार आहे. पुढील तपासासाठी फैय्याजची आणखी काही दिवस पोलीस कस्टडी मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पुणे व इराणमध्ये रहात असलेल्या फैय्याजच्या कुटुंबियांनाही पोलिसांनी फैय्याजच्या अटकेची माहिती देत चौकशीसाठी बोलवल्याचे कळते.

Comments are closed.