मुलाच्या मृत्यूवर अमित साटम फिदीफिदी हसल्याचा आरोप, संजय राऊत संतापून म्हणाले, ‘तुमच्या अंत्यया
अमित साटम यांच्यावर संजय राऊत: मुंबई (Mumbai) आणि मुंबई उपनगर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. चेंबूर (Chembur) येथे 29 जून रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर साकीनाका (Sakinaka) येथे 2 जुलै रोजी उघड्या मॅनहोल (Manhole) मध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. या दोन घटनांनंतर मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनावर सर्व स्तरातून टीका होत असताना, भाजप (BJP) मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम (Ameet Satam) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दुर्घटनांचा उल्लेख सुरू असताना अमित साटम हसताना दिसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस काही काळापूर्वी इतके बोलायचे, आता ते का बोलत नाहीत? एक उपमुख्यमंत्री आजारी पडले आहेत, ते इस्पितळात आहेत. इतक्या दुर्घटना, अपघात, मृत्यू महाराष्ट्रात आणि मुंबईत घडत आहेत, गुन्हे घडत आहेत, ना मुख्यमंत्री त्यावर बोलत आहेत, ना उपमुख्यमंत्री बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं, ते एवढंच बोलायला उघडलं की जे सहा खासदार फोडले त्यात माझा देखील हात आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोन जण मेली, रोज हत्या होत आहेत आणि तुम्ही तोंड उघडत आहात ते फक्त सहा खासदार फोडण्यात माझा असा सहभाग आहे हे दाखवण्यासाठी,” असा घणाघात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
Sanjay Raut on Ameet Satam: या घटनेला कोण जबाबदार आहे?
“चेंबूरच्या अकरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्याकडे मुख्यमंत्री गेले का? ते अग्रवालकडे गेले. कारण दिल्लीतून अमित शाहांचा आदेश आला होता. काल त्या भागातील खासदार अनिल देसाई तिथे जाऊन आल्यानंतर जे वर्णन करत होते ते भयंकर होतं. या घटनेला कोण जबाबदार आहे? महापालिकेत कोणाची सत्ता आहे? जबाबदारी घ्या,” अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut on Ameet Satam: तुमच्या अंत्ययात्रेला लोकं भाड्याने बोलवावी लागतील
संजय राऊत पुढे म्हणाले की, “तुमचा मुंबईचा अध्यक्ष फिदीफिदी हसत आहे. ही तुमची प्रतिक्रिया? इतका क्रूर चेहरा भाजपचा मुंबईत आणि महाराष्ट्रात आम्ही पाहतोय. देवेंद्र फडणवीस, तुम्ही संवेदनशील आहात ना? तुमची संवेदनशीलता फक्त आमदार, खासदार फोडण्यापुरतीच आहे का? बघा जरा या राज्यात आणि मुंबईत काय चाललं आहे. या लोकांना काही पडलेलं नाही, या लोकांना मन नाही. हे फक्त शिवसेनेचे आमदार, खासदार फोडणे, ठेकेदारांकडून खंडणी गोळा करणे आणि ते आमदार, खासदारांना देणे, हेच करत आहेत. काल एक अपक्ष आमदारा वीस कोटीला विकत घ्यायचा प्रयत्न झाला आणि अमरावतीमधून जागा द्यायचं सांगितलं. या लेव्हलला महाराष्ट्राचे राजकारण सुरू आहे. तुमच्या अंत्ययात्रेला कोण येईल? तुम्हाला अंत्ययात्रेला लोकं भाड्याने बोलवावी लागतील,” अशी टीका देखील त्यांनी केलीय.
आणखी वाचा
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Comments are closed.