राम मंदिर दान चोरी विरोधात जनसामान्यांच्या आक्रोशाची ठिणगी मातोश्री वरूनच पडणार : उद्धव ठाकरे
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांची बैठक संपन्न झाली. आमदारांच्या बैठकीत अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरी प्रकरण, राज्यभरातील रामरक्षा आंदोलनाचं आयोजन, संघटना बांधणी, एसआयआर मोहीम आणि विधिमंडळ अधिवेशन यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर निर्माणाच्या आंदोलनाची ठिणगी मातोश्रीतून पडली आता राम मंदिर चोरीच्या जनसामान्यांच्या आक्रोशाची ठिणगी सुद्धा मातोश्री वरूनच पडणार असल्याचं म्हटलं. राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राम मंदिरमधील चोरीच्या विरोधात रामरक्षा आंदोलन करण्यात यावे,अशी सूचना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केली. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलन करण्यात येणार असून स्वत: उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
उद्धव ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन
अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यात नागपूरमध्ये संघाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राम रक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये राम रक्षा आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे.
काँग्रेस आप सपा हे पक्ष सुद्धा राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी आवाज उठवत आहेत. आपण देखील राज्यभरात आंदोलन केलं पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना केल्या आहेत. राज्यभरात आंदोलन कसं करता येईल याबाबत आमदार म्हणून तुम्ही जातीन लक्ष घाला असं उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भात महत्त्वाच्या सूचा केल्या. ज्या ठिकाणी बंडखोर आणि त्यांच्यासोबत जे पदाधिकारी गेले ती रिक्त पद लवकर भरून काढा आणि नव्या नियुक्त करा, असंही ते म्हणाले. एसआयआर वर विशेष लक्ष केंद्रित करा, एसआयआर मोहीम राबवली जात असताना ठीक ठिकाणी आपले मतदार वगळले जात नाहीत ना याची खबरदारी घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस राहिले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातले आणि मुंबईचे प्रश्न मांडा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
1) नितीन देशमुख
2) सुनील राऊत
3) भास्कर जाधव
4) बाळा नर
5) अंबादास दानवे
6) ज. मो. अभ्यंकर
7) मनोज जामसुतकर
8) अनिल परब
९) हारून खान
10) महेश सावंत
11) संजय देरकर
12) अजय चौधरी
13) वरुण सरदेसाई
14) दिलीप सोपल
15) सिद्धार्थ खरात
16) सुनील शिंदे
17) बाबाजी काळे
18) गजानन लवटे
19) कैलास पाटील
20) प्रवीण स्वामी
२१) सुनील प्रभू
Comments are closed.