अमित शाह-देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाच्या मु
Amit Shah and Devendra Fadnavis: नर्मदा प्रकल्पाबाबत दिल्लीत मंगळवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमित शाह (Amit Shah) यांची स्वतंत्र बैठक झाली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेत उभय नेत्यांमध्ये महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणातील समीकरणांविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. (Maharashtra Politic news)
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7 ते रात्री 10 दरम्या अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र भेट झाली. या भेटीत फडणवीस आणि अमित शाह यांनी राज्यातील भविष्यातील रणनीतीवर चर्चा केल्याची माहिती आहे. या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, राष्ट्रीय भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील चेहऱ्यांचा समावेश याबाबत सविस्तर बोलणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह आणि फडणवीस यांच्यातील बैठकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळात सध्या कोणताही बदल केला जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय अमित शाह यांनी काल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचीही स्वतंत्र भेट घेतली.
नर्मदा प्रकल्पाच्या कालच्या दिल्लीतील बैठकीला अमित शाह, देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मध्य प्रदेशचे मुख्य सचिव अनुराग जैन, अतिरिक्त मुख्य सचिव नीरज मंडलोई आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नर्मदा नदी प्रकल्पातील पाण्याचे वाटप, बाधित लोकांचे पुनर्वसन आणि जमिनीचा मोबदला यांसारख्या दशकांपासून प्रलंबित असलेल्या वादांवर महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक सहमती झाल्याचे समजते.
Sharad Pawar NCP: शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सत्तेत सामील होण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या मुंबईतील गुप्त भेटीनंतर शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. “महाराष्ट्रातून NDA मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष NDA मध्ये राहतील. कुठलाही नवीन पक्ष आता एनडीएमध्ये येण्याची आमची चर्चा नाही”, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. “आम्ही शरद पवारांच्या सोबतच्या कुणालाही फोडण्याचा प्रयत्न करत नाही. जे त्यांच्यासोबत आहेत, शरद पवार यांच्या पक्षात जे आमदार आणि खासदार आहेत, त्यापैकी कुणालाही फोडण्याचा आमचा प्रयत्न नाही”, असेही फडणवीसांनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=tAbJ8dUD7 नाही
आणखी वाचा
Comments are closed.