Video मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले,मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
मुंबई : राज्यात गेल्या 4 दिवसांपासून गहाळ लिंक चांगलाच चर्चेत आला असून मिसिंग लिंकवर कोसळेलेल्या दरड दुर्घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहातून विरोधकांवर हल्लाबोल केला. मिसिंग लिंकसंदर्भाने टीकाकारांना लक्ष्य करताना, एकवेळ माझा अपमान करा पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, असे फडणवीसांनी म्हटले. त्यावरुन, मनसेप्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मिसिंग लिंकवरुन बोलल्यावर तुमचा अपमान कसा झाला? असा सवाल राज ठाकरेंना विचारला. तसेच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे ना तू, मग हिंदीत का बोलता? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर, आता फडणवीसांनी मिमिक्री आर्टिस्ट म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला.
कनेक्टींग लिंक संदर्भात 7 हजार पाण्यात गेले हा माझा अपमान नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, त्या पसरवणं हा महाराष्ट्राचाच अपमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला सभागृहात प्रत्युत्तर दिलं. तसेच, मिमिक्री आर्टिस्ट म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरही पलटवार केला. मी हिंदीत बोललो, ‘भाडे ते टट्टू’ म्हटल्यावर काहींना दु:ख झालं. त्यामुळे, जाऊन मी अभ्यास केला, भाडे टे टट्टू या शब्दाला आता सुसंस्कृत भाषेत ‘भाटक गदर्भ’ म्हणतो, तरीही कोणाला समजलं नसेल तर सुपारीबाज… असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला.
मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले, हिंदीत का बोलतो?
मी काही सुपारीबाजांबद्दल बोललो होतो, मी तर टोपी फेकली होती पण अनेकांना का लागली मला समजलं नाही. मी एक वाक्य हिंदीत बोललो, ज्यांना समजायला पाहिजे त्यांच्यासाठी बोललो, पण दुसऱ्यालाच मिर्ची लागली. पण, आमचे मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले हिंदीत का बोलले? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सभागृहातून लगावला. तसेच, ते आमचे मित्र आहेत, ते मित्र असल्यामुळे राजकारणात आम्हाला त्यांच्यापासून काही धोका नाही. पण, ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं अशी खिल्ली देखील फडणवीसांनी राज ठाकरेंची उडवली.
हेही वाचा
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Comments are closed.