‘ऑपरेशन टायगर 3’ मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे ‘मतपरिवर्तन’ केल्याचा मोठा द

ऑपरेशन टायगर 3: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेने ठाकरे गटाला आधीच 6 खासदार आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या रूपाने मोठा धक्का दिला आहे. हा धक्का ताजा असतानाच, आता शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ‘ऑपरेशन टायगर-३’ (Operation Tiger 3) राबवण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या नव्या मोहिमेमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षांना पुन्हा एकदा मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Operation Tiger 3: ठाकरेंच्या 10 आमदारांचे मतपरिवर्तन?

शिंदेंच्या शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या तब्बल 10 आमदारांचे (MLAs) शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे मन वळवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या आमदारांसोबत अतिशय गुप्त बैठका आणि भेटीगाठी सुरू होत्या, ज्याला आता मोठे यश आल्याचा दावा केला जात आहे.

Operation Tiger 3: पक्षांतरबंदी कायदा टाळण्यासाठी ‘हा’ प्लॅन

या मोहिमेत केवळ 10 आमदार आणल्यास पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा उगारला जाऊ शकतो, हे ओळखून शिंदे गटाने मोठी रणनीती आखली आहे. तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी ठाकरे गटाचे आणखी किमान 5 आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. एकूण 15 आमदारांचा गट फुटल्यास कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळू शकते. याशिवाय, ठाकरे गटाच्या आणखी एका विद्यमान खासदाराशीही (MP) संपर्क साधण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.

NCP Sharad Pawar: शरद पवारांची राष्ट्रवादीही शिंदेंच्या रडारवर

या ‘ऑपरेशन टायगर-3’ चा रोख केवळ उद्धव ठाकरे यांच्यावरच नाही, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही आहे. शरद पवारांच्या पक्षातील काही प्रमुख आमदार आणि खासदार सध्या सत्ताधारी शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी प्राथमिक चर्चा यशस्वी झाली असून आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट होण्याची चिन्हे असल्याची माहिती समोर येत आहे.

Operation Tiger 3: ‘या’ दोन शिलेदारांवर सोपवली मोठी जबाबदारी

या हाय-प्रोफाईल मोहिमेची संपूर्ण सूत्रे पडद्यामागून हलवण्यासाठी दोन विश्वासू नेत्यांची निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे ॲड. निलेश देशमुख यांच्या खांद्यावर या ऑपरेशनची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी अत्यंत कमी कालावधीत ही मोहीम फत्ते करण्याची तयारी शिंदे गटाने केली असून, यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Operation Tiger: नाशिकमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा, 5 कोटींच्या आमिषाचा पर्दाफाश करत ठाकरेंचे नगरसेवक एकत्र जमले; गटनेत्यांचा थेट ‘ऑपरेशन तुडवा’चा इशारा, नेमकं काय घडलं?

Comments are closed.