भारतासह परदेशात नेटवर्क असलेल्या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 2 परदेशी महिलांसह पाच जण ताब्या
नागपूर क्राईम न्यूज: भारतासह परदेशात नेटवर्क असलेल्या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा (Online Sex Racket) नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी नागपुरातील अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दोन परदेशी महिलांसह पाच महिला सेक्स वर्कर (Nagpur Crime News), तसेच त्यांच्याकडून देहविक्री करून घेणाऱ्या एका आरोपीला (Crime News)ताब्यात घेतले आहे. सचिन महाजन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार समीर ऊर्फ मनीष ठाकूर तसेच राहुल आणि पूजा नावाचे आरोपी मात्र फरार झाले आहे. (Nagpur Online Sex Racket)
Nagpur Crime: परदेशी महिलांच्या पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू, मुख्य सूत्रधार फरार
दरम्यानपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन सेक्स वर्कर उझबेकिस्थानच्या, तर एक दिल्ली, एक पंजाब आणि एक कोलकात्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या पाचही जणींना देह व्यापार करण्यासाठी गेल्याच आठवड्यात नागपुरात आणण्यात आले होते. फक्त पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर धडक कारवाई करत या भारतासह परदेशात नेटवर्क असलेल्या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अशातच ताब्यात घेण्यात आलेल्या परदेशी महिलांच्या पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तूर्तास पाचही महिलांना करुणा महिला सुधार गृहात ठेवण्यात आले आहे.
Akola Crime News : सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीसंदर्भात अकोल्यात दोन बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल
राज्यात निकृष्ट दर्जाचे बियाणे देणाऱ्या कंपनींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेयेत. अमरावतीनंतर आता थेट अकोल्यात सोयाबीन बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. उगवण चाचणीमध्ये नापास झालेले बियाणे या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा गंभीर आरोप होताय. अकोला जिल्ह्यासह धाराशिव, लातूरजालना, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन उगवलं नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्याय. सोयाबीन पेरणी करूनही दोन आठवडे उलटल्यानंतरही साधा अंकुर फुटेना, अशी परिस्थिती होतीय. सोयाबीन बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्यानंतर प्राथमिक अहवालानुसार बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे अहवालातून समोर आलंये. अखेर अकोल्यात सिटी कोतवाली आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात बूस्टर आणि रवी सीड्स बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल झालेये.
Akola News : जवळपास 1000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी
दरम्यान, अकोल्यात दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सोयाबीन कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मोठं आंदोलन केलं होतंय. मिटकरी यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मुरली इंगळे यांना कार्यालयात कोंडत तब्बल तीन तास जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय ठिया दिला होताय. मिटकरी यांना कृषी विभागाने दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मंगळवारपर्यंतची वेळ मागितली होतीय. मागितलेल्या मुदतीच्या दोन दिवसा आधीच कृषी विभागाने आता कृषी कंपन्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केलीय. दरम्यान, अकोला जिल्ह्यात जवळपास 1000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेयेत.
Comments are closed.