‘सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे’

सोनम वांगचुकवर धनंजय महाडिक: लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतील आंदोलनावरून भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी मोठा दावा केला आहे. सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा मूळ हेतू बाजूला राहून आता या आंदोलनाला वेगळंच वळण मिळालं असून, त्यात देशविरोधी घटक सक्रिय झाल्याचे महाडिक यांनी म्हटलं आहे.

आंदोलन चिरडण्याचा हेतू नाही

सोनम वांगचूक यांच्यावर केलेल्या पोलीस कारवाईबाबत स्पष्टीकरण देताना खासदार महाडिक म्हणाले की, “प्रशासनाचा किंवा सरकारचा हे आंदोलन चिरडण्याचा कोणताही हेतू नाही. सोनम वांगचूक यांची तब्येत खालावल्यामुळेच केवळ त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.” एकदा का त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाली, की त्यानंतर ते पुन्हा त्यांचं आंदोलन करू शकतात, असे ते म्हणाले. महाडिक म्हणाले की, “हा संपूर्ण विषय मूळचा ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या संदर्भातील तक्रारी आणि मागण्यांचा होता. मात्र, गेल्या काही दिवसांत हे आंदोलन मूळ मुद्द्यावरून भरकटले असून त्याला पूर्णपणे वेगळे वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे.” आंदोलनाच्या नावाखाली अशा देशविरोधी शक्तींनी एकत्र येऊ नये, इतकीच आमची सरकार म्हणून स्पष्ट भूमिका असल्याचे ते म्हणाले.

गुंडांना आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी त्यांना पाचशे रुपये दिले जात आहेत

दरम्यान, जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसलेल्या कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकली. यावेळी मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. यावेळी अभिजित दिपके यांनी आंदोलनात पाचशे पाचशे रुपये देऊन गुंड घुसवल्याचा गंभीर आरोप केला. दुसरीकडे, दिल्लीच्या जंतर मंतरवर 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात नेले. पोलीस साध्या वेशात आले आणि त्यांनी वांगचुक यांना पांढऱ्या चादरीत गुंडाळून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. आंदोलकांनी विरोध केल्याने गोंधळ निर्माण झाला.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.