वैभव सूर्यवंशीची झिम्बाब्वेविरुद्ध विश्वविक्रमी फिफ्टी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात 'ही' कामगिरी…

भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वे दौऱ्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने रविवारी (26 जुलै) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात अर्धशतक केले, जे त्याचे या मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरले. त्याने हे दुसरे अर्धशतक करताच एका खास विश्वविक्रमाची नोंद आपल्या नावे केली. त्याचबरोबर नेपाळच्या फलंदाजालाही मागे टाकले आहे.

वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो या तिसऱ्या सामन्यात संयमाने फलंदाजी करताना दिसला. त्याचे शॉट सिलेक्शनही उत्तम होते. त्याने ही अर्धशतकी खेळी करताच पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाची १६ वर्ष पूर्ण होण्याआधी दोन अर्धशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज, हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

विक्रमी अर्धशतक करताना वैभवने नेपाळच्या कुशल मालाला मागे टाकले, ज्याने वयाच्या १६ वर्ष पूर्ण होण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदा 50 किंवा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला होता.

वैभव झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात ४९ चेंडूंत ८१ धावा करत बाद झाला. त्याची ही आंतरराष्ट्रीय टी २० मधील सर्वोत्तम फलंदाजीची कामगिरी ठरली आहे. त्याने या संघाविरुद्ध पहिले अर्धशतक केले असता त्याचे वय १५ वर्ष आणि ११८ दिवस होते, तर दुसरे अर्धशतक वयाच्या १५ वर्ष आणि १२१ दिवसांनी झळकावले.

टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50+ धावा करणारा सर्वात युवा खेळाडू
15 वर्ष 118 दिवस – वैभव सूर्यवंशी विरुद्ध झिम्बाब्वे,
15 वर्ष 121 दिवस – वैभव सूर्यवंशी विरुद्ध झिम्बाब्वे,
17 वर्ष 296 दिवस – रहमनुल्ला गुरबाज विरुद्ध झिम्बाब्वे

Comments are closed.