20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
चंद्रपूर : राज्यात एसीबीकडून(ACB) सुरू असलेल्या धाडीत अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, शिपायापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत बेड्या ठोकल्याचं दिसून आलं. आता, वन विभागातील अधिकाऱ्यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक (Bribe) विभागाने सापळा रचून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भद्रावतीच्या (Chandrapur) वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय कर्मचाऱ्यांवर धाड टाकण्यात आली होती. अवैध रेती वाहतूक कारवाईतील वाहन सोडवण्याकामी येथील कर्मचाऱ्यांनी 20 हजार रुपयांच्या लालेची मागणी केली होती.
वनपाल-वनरक्षक आणि एक खासगी इसम अशा तिघांना एसीबीने लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करत ताब्यात घेतले. या प्रकरणात तक्रारदार घराच्या कामासाठी अवैधरित्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक करत होता. या ट्रॅक्टरवर वनपथकाने कारवाई करत या कारवाईतील प्रक्रिया पूर्ण करून ट्रॅक्टर लवकर सोडवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. येथील भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यक्रयातील वनपाल कोमल घुगलोत आणि वनरक्षक संदीप पारवे यांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपये लाच मागितली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार वनपाल कोमल घुगलोत, वनरक्षक संदीप पारवे आणि रक्कम स्वीकारणारा खासगी इसम ललित नागपुरे अशा तिघांना एसीबीने रंगेहात अटक केली. याप्रकरणी पुढील तपास चंद्रपूर एसीबीकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.