ट्रम्प यांच्या पराभवाचे जागतिक स्तरावर पडसाद; कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या खाली, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार?
जगभरात आर्थिक आणि राजकीय गोंधळ उडवून देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला आहे. अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला. सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष अल्पमतात गेला असून यामुळे पुढील दोन वर्षे ट्रम्प यांना वर्चस्व गाजवू शकणार नाहीत. ट्रम्प यांच्या या पराभावचे पडसाद आता जागतिक स्थरावर दिसू लागले आहेत. हिंदुस्थानी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1400 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 400 अंकांनी वधारला आहे. याशिवास सर्वात महत्त्वाचे म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील घडामोडींनंतर ब्रेंट क्रूडचे दर थेट 100 डॉलरच्या खाली घसरले आहेत. हे भाव 8 टक्क्यांहून अधिक घसरून 94.91 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव 88.42 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. हा दोन महिन्यांतील निचांकी स्तर आहे. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
जबर धक्का, ट्रम्प हरले! अमेरिकी संसदेच्या सिनेट आणि रिप्रेझेंटेटिव्हज्वर डेमोक्रॅट्सचे वर्चस्व
दरम्यान या निकालांच्या पार्श्वभूमिवर वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील चर्चेसाठी कतारने मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. संभाव्य शांतता कराराबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या वृत्तामुळे मध्यपूर्वेतील तेल पुरवठा सुरळीत होईल अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, वाटाघाटी अजूनही अनिश्चित असून, दोन्ही बाजू अद्याप करारापासून दूर असल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निवडणुकांच्या काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांमी इराणवर मोठा हल्ला करण्याचे संकेत दिले होते. मात्र सध्या अमेरिकेचा इराणवर हल्ला करण्याचा कोणताही विचार नाही, असे विधान ट्रम्प यांनी केले आहे. एकीकडे अण्वस्त्र हल्ला करण्याची भाषा करणारे ट्रम्प यांनी आता निवडणुकांच्या निकालानंतर युटर्न घेतला आहे. ट्रम्प यांच्या विधानामुळे तणाव काहीसा कमी झाला आहे.
Comments are closed.