Photo – शिवसेनेची मुंबईकरांना दिवाळीची भेट
शिवसेनेच्या वतीने मुंबईत दिवाळीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांअंतर्गत शिवसेनेकडून नागरिकांना दिवाळी भेटवस्तू, दिवाळी साहित्य वाटप व उटण्याचे वाटप करण्यात आले. शिवसेनेने आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिवसेना शाखा क्र. 142 च्या वतीने रांगोळी साहित्य व मिठाई वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख शिवाजी झोरे यांच्या आयोजनातून पार पडलेल्या या कार्यक्रमाला विभागसंघटक प्रज्ञा सकपाळ, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण, हेमंत साळवे, इम्रान पटेल, रघुनाथ शिंदे, सुभाष चौगुले हे प्रमुख उपस्थित होते.

विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांच्या वतीने विभागात भेटवस्तू आणि सुगंधी उटणे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना नेते – आमदार ऍड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला. विधानसभा संघटक संदीप नाईक, शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, आनंद पाठक, गजानन राऊत, हंसराज गुप्ता, जितेंद्र शिर्के, राजेश रोकडे यावेळी उपस्थित होते.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, धारावी विधानसभेच्या सुगंधी उटणे वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते झाला. या उपक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख किरण काळे यांनी केले असून उपसचिव प्रवीण महाले, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस निखिल सावंत, स्थानीय लोकाधिकार समितीचे संयुक्त सचिव दिनेश बोभाटे उपस्थित होते.

कामगार मैदान येथील परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने मंडळातर्फे धाराशिव जिह्यातील दुष्काळग्रस्त गावांना दिवाळीनिमित्त फराळ आणि भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहे. ही सर्व सामग्री आज रवाना करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, आमदार अजय चौधरी, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, राजन म्हाडगुत, प्रशांत मोरे, भारत म्हाडगुत, रमेश सावंत, उदय परब, विकास फाटक उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 70 तर्फे दिवाळीनिमित्त गटप्रमुख व उपशाखाप्रमुखांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या भेटवस्तूंचे वाटप शिवसेना नेते – आमदार ऍड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया तसेच उपविभागप्रमुख शरद जाधव उपस्थित होते.

विभाग क्रमांक 6 चे विभागप्रमुख सोमनाथ सांगळे व विभागसंघटिका मनीषा नलवडे यांच्या हस्ते उटणे वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेविका चित्रा सांगळे, उपक्रमाचे आयोजक युवासेना उपविभाग अधिकारी शुभम कांबळे, विधानसभा प्रमुख भास्कर पाटील, विभाग अधिकारी मनोज (बालाजी) सांगळे, कृष्णा नलवडे उपस्थित होते.
Comments are closed.