क्रीडानगरीतून – पंकज अडवाणीची विजयी सलामी
हिंदुस्थानचा दिग्गज क्यूइस्ट पंकज अडवाणीने आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सुरुवात केली. फिलिपाइन्सच्या मायकेल मेंगोरियोविरुद्ध त्याने 4-1 असा विजय मिळवला. सामन्यात अडवाणीने पहिल्या फ्रेममध्ये 100 गुणांचा ब्रेक नोंदवला, तर पाचव्या फ्रेममध्ये 109 गुणांचा ब्रेक मारून आपले वर्चस्व सिद्ध केले. हिंदुस्थानच्या एस. श्रीकृष्णानेही कुवेतच्या अब्दुल्ला अलयुसेफवर 4-0 असा विजय मिळवला. महिला गटात अमी कामानीने सलग दोन विजय मिळवले, तर गतविजेत्या अनुपमा रामचंद्रननेही विजयी सलामी दिली.
वेलावन सेंथिलकुमार उपांत्य फेरीत
हिंदुस्थानच्या वेलावन सेंथिलकुमारने कतारमधील क्यूएसएफ-3 पीएसए कॉपर स्क्वॉश स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. इजिप्तच्या पाचव्या मानांकित ओमर सईदवर त्याने सरळ तीन गेममध्ये विजय मिळवला. वेलावनने 11-9, 11-1, 13-11 अशा गुणांनी सामना जिंकला. विशेष म्हणजे दुसऱया गेममध्ये त्याने प्रतिस्पर्ध्याला केवळ एक गुण मिळू दिला.
हालांदचा ९६ व्या मिनिटाला गोल
नेशन्स लीग फुटबॉलस्पर्धेत नॉर्वेने डेन्मार्कवर 3-2 असा सनसनाटी विजय मिळवला. एकवेळ नॉर्वेचा संघ 0-2 असा पिछाडीवर होता. मात्र एार्ंलग हालांदने दोन गोल करत सामन्याचे चित्र पालटले. विशेष म्हणजे 96 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर हालांदने निर्णायक गोल नोंदवला. अखेरच्या क्षणी मिळालेल्या या विजयामुळे नॉर्वेने नेशन्स लीगच्या पुढील फेरीत स्थान निश्चित केले. दोन गोलची आघाडी गमावल्यामुळे डेन्मार्कला मोठा धक्का बसला.
Comments are closed.