बिसलेरीचे पाणी अशुद्ध! नमुन्यात कर्करोगास कारणीभूत घटक आढळले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बाटलीबंद पाण्याची हिंदुस्थानात सुरुवात करणाऱ्या ‘बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि.’ या कंपनीविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) कायदेशीर कारवाई करण्यासाठी परवानगी दिली आहे. बिसलेरीचे पाणी सुरक्षित नसून, त्यात कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक आढळले आहेत. यासंदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर एफएसएसएआयने हे पाऊल उचलले आहे.

बिसलेरी कंपनीच्या परिसरातून बाटलीबंद पाण्याचा एक नमुना तपासणीसाठी गोळा करण्यात आला होता. त्यात ‘ब्रोमेट’ हा घटक निर्धारित प्रमाणापेक्षा बराच जास्त आढळला. त्यामुळे कंपनीचे पाणी असुरक्षित असल्याचे जाहीर केले होते. कंपनीने अपील केल्यानंतर हा नमुना पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला. तेथेही या नमुन्यात ‘पॉलिन्युक्लिअर अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स’ (Polynuclear Aromatic Hydrocarbons) आढळून आले आहेत

Comments are closed.