‘जीएमएलआर’ मार्गात तेराशे झाडांवर कुऱ्हाड!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘गोरेगाव-मुलुंड लिंक रोड’च्या कामात तब्बल तेराशे झाडांवर कुऱ्हाड चालणार आहे. या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमींचा प्रचंड विरोध असतानाही पालिकेने ही झाडे तोडण्याचे निश्चित केले आहे. ही झाडे तोडण्यासाठी पालिकेने या झाडांवर नोटिसा चिकटवल्या असून नंबरही टाकले आहेत. त्यामुळे ही शेकडो झाडे अखेरच्या घटका मोजत आहेत.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे मुंबई पूर्व आणि पश्चिमला वेगाने जोडले जाणार असा पालिकेचा दावा आहे. या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरूदेखील आहे. या मार्गातील एका पुलासाठी ही तेराशे झाडे तोडण्यात येणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीवर आक्षेप घेतला आहे. या कामात एपूण 1 हजार 352 झाडे तोडण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे पर्यावरणप्रेमींचा विरोध असतानाही ही झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही झाडे तोडण्याचा निर्णय झाल्यानंतर पालिकेकडून नियमाप्रमाणे हरकती-सूचनादेखील मागवण्यात आल्या होत्या. मात्र ही झाडे तोडण्यासाठी या झाडांवर आता लेखी नोटिसा लावण्यात आल्या असल्याने पालिकेच्या पर्यावरणविरोधी भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.