राहुल गांधी मुंबईत अन् काँग्रेस उपाध्यक्षांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; नव्या प्रदेशाध्यक्षां
बुलढाणा : काँग्रेस (Congress) पक्षाला सातत्यानं धक्के बसत आहेत. अनेक नेते पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. दरम्यान, आज काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मुंबईत असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे (Vijay Ambhore) हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळात मुंबईतील मलबार हील येथे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
विजय अंभोरे यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा व काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेस पक्षासाठी बुलढाणा जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या स्वजिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसापूर्वीच प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर लगेच विजय अंभोरे यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्के बसत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच नाशिकमध्ये काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जात होते. काही दिवसांपूर्वी डॉ.हेमलता पाटील यांनी पक्षावर नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आज पुन्हा बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विजय अंभोरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला घरघर
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला घरघर लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची मोठी पिछाडी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजप आणि मित्रपक्षानं राज्यात मुसंडी मारल्यानं अनेकांनी सत्ताधारी पक्षांची वाढ धरल्याचं पाहायला मिळालं.
https://www.youtube.com/watch?v=5aq8-5adams
महत्वाच्या बातम्या:
Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडणार? शिवसेना पक्षप्रवेशावर केलं मोठं विधान, म्हणाले, ‘जाताना लपून जाणार नाही…’
अधिक पाहा..
Comments are closed.