दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफरवर नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली…

भंडारा : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात राजकीय भूकंप झाला होता. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांना दिलेल्या ऑफरसंदर्भात आता नाना पटोलेंनी घुमजाव केलं आहे. काल होळीचा दिवस होता, धुलीवंदनाचा दिवस होता आणि आमच्या संस्कृतीमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. आपापसातील सगळे मतभेद विसरून आम्ही सर्वांनी राज्यातील जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यामुळे राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडी चालल्या आहेत, त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हंटल आहे की, बुरा नं मानो होली है.. असं म्हणून त्या विषयाला मी गमतीनं घेतलं आहे. काही लोक सिरीयस घेत असतील तर, त्यांनी सिरीयस राहावं… असे म्हणत काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावरुन यु-टर्न घेतल्याचं दिसून आलं.

आमच्यासाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना साधे विद्युत पंप मिळत नाहीत, तर सरकार सौर ऊर्जेचे पंप द्यायला निघाले होते ते पण देत नाहीत. जंगली जनावरांचा गावांमध्ये हैदो सुरू आहे. वाघ फिरत आहेत, तरुण पोरांच्या हाताला काम नाही, महागाई आभाळाला टेकलेली आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढलेला आहे. राज्यात सर्वात उंच कोणतं डोंगर असेल तर, राज्यावर असलेलं कर्जाचं डोंगर हे सर्वात उंच आहे. सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे. ही काळजी काँग्रेसला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून आम्हाला काळजी आहे की, जनतेच्या प्रश्नाला घेऊन चर्चा व्हावी, काल थट्टेचा दिवस होता थट्टा आता संपली. सरकारने आता खऱ्या अर्थानं त्या प्रश्नांना घेऊन आणि माध्यमांनीही तेच प्रश्न घेऊन समोर यावं, असा नाना पटोले यांनी म्हटले. एकप्रकारे आपल्या कालच्या वक्तव्यावरुन नानांनी यु-टर्नच घेतल्याचे पाहायला मिळाले. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. मात्र, आता बुरा न मानो होली है… असे म्हणत त्यांनी युटर्न घेतला आहे.

या सरकारमध्ये 65 टक्के मंत्री हे दागी आहेत, त्यांच्यावर आरोप आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 65 टक्के मंत्री दागी असतील तर अशातूनचं त्यांची मानसिकता लक्षात येते. त्यामुळे फडणवीसंनाच आम्ही नेहमी सांगतो की, एक मंत्री नाही तर 65 टक्के मंत्र्यांना या मंत्रिमंडळातून काढावे लागते. अनेक मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप आहेत, या ठिकाणी मी त्यांच्यावर टिप्पणी करणार नाही. एकीकडे ओएसडी कसा असावा, पीए कसा असावा याच्यावरचे नॉर्मस फडणवीस ठरवतात. आरएसएसचे लोक टाकायचा प्रयत्न करतायेत का तो एक भाग आहे. हे जे डेप्युटी कलेक्टर रँकचे जे काही अधिकारी आहेत, त्यांना भ्रष्टाचारी म्हणायचं आणि त्यांना ओएसडी होऊ द्यायचं नाही, असा एक प्रकार अलीकडच्या काळात महाराष्ट्रात आपण बघतोय, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

कितीतरी भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्‍यांच्या बाजुला बसतात

राज्यातील फडणवीस यांच्या सरकारमधील 65 टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कितीतरी वॉशिंग मशिनमध्ये गेले आणि साफ होऊन आले आहेत, त्याच्यातले कितीतरी त्यांच्या आजुबाजूला बसतात. मग नॉर्मस् लावायचे आहे तर सगळ्यांना लावा. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करा ही आमची भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. दरम्यान, कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर लावलेल्या आरोपावर नाशिक कोर्टाने नोंदविलेल्या निरीक्षणावर नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली.

हेही वाचा

घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल

अधिक पाहा..

Comments are closed.