कधी ना कधी योग येईल, मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार स्पष्टच बोलले, सभागृहात हशा पिकला

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री (मुख्यमंत्री) पदावर बसण्याची इच्छा अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी इच्छा देखील बोलून दाखवत होते. अनेक ठिकाणी तशी बॅनरबाजीही पाहायला मिळाली. मात्र, अजित पवार (Ajit pawar) प्रॅक्टिकली स्पष्ट शब्दात सांगतात. तसेच, राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाबाबत परखड भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्ताने गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला विराजमान झाली पाहिजे, त्यावर अजित पवारांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. राही भिडे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची संधी महिलेला मिळाली पाहिजे. आपल्या सर्वांना तसं वाटतं. पण, त्यासाठी योग यावा लागतो. आता, मलाही कित्येकदा वाटतं की आपण मुख्यमंत्री झालं पाहिजे, पण नाही योग येत. कधी ना कधी तो योग येईल, असे अजित पवारांनी म्हटले. त्यावेळी, सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान, अजित पवारांनी यापूर्वी देखील मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले होते. भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून सर्वांनाच आश्चर्यकारक धक्का दिला होता.  त्यावरून बोलताना अजित पवारांनी म्हंटलं होतं की, मला जर माहिती असतं मुख्यमंत्रीपद देणार आहेत. तर, मी सगळेच आमदार घेऊन तेव्हाच भाजपसोबत गेलो असतो. त्यावेळी देखील चांगलाच हशा पिकला होता.

व्हिडिओ  –

https://youtube.com/shorts/rw_gdzbqjqq?feature=shared

हेही वाचा

Ajit Pawar … नाहीतर तुमची जागा रोबोट घेईल, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा चिमटा

अधिक पाहा..

Comments are closed.