मुळा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी प्रकल्प तातडीने उभारा
हिंजवडीतील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून मुळा नदीचे प्रदूषण रोखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुळा नदीवर शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) तातडीने उभारा. तसेच रस्ते, वाहतूक आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवरही वेगाने उपाययोजना करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पुण्यातील हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आज झाले. आता हिंजवडी परिसरातील वाढत्या नागरी समस्यांकडेही शासनाने लक्ष द्यावे, असे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
Comments are closed.