अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांची लगीनघाई; कुठं अन् कधी?


पुणे : एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात जाऊन प्रचारात गुंतले आहेत. मात्र, पवारांच्या घरात दोन लग्नांची आई आहे, बारामतीत लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुका आल्या की निवडणुकीच्या रणांगणात दिसणारं पवार कुटुंब मात्र यंदाच्यावेळी लग्नात व्यस्त असल्याचे पाहायला मिळते. कारण, अजित पवारांविरुद्ध (Ajit Pawar) विधानसभा निवडणूक लढवलेल्या युगेंद्र पवारांचं लग्न येत्या 30 नोव्हेंबर रोजी आहे. तर, 5 डिसेंबरला जय पवारांचं लग्न आहे. त्या निमित्ताने पवार कुटुंब लग्नात अडकले का? असाही प्रश्न विचारला जात आहे.

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडाला असताना पवार कुटुंब मात्र लग्नाच्या तयारीत रंगले आहे. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार येत्या 30 नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकणार आहेत. युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा मुंबईत पार पाडणार आहे, त्या निमित्ताने युगेंद्र पवारांनी प्रचारांची जबाबदारी आटपून लग्नाची तयारी केल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे जय पवार देखील डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. जय पवार यांचा विवाह सोहळा बाहेरच्या देशात पार पडणार असल्याची माहिती आहे. (जय पवार यांचा विवाह बहरिन येथे पार पडणार असल्याची माहिती आहे) येत्या 5 डिसेंबरला जय पवारांचा विवाह बंधनात अडकणार आहेत.

निवडणुकीच्या काळात मैदानात उतरणारे, पक्षाची आणि वडिलांची बाजू सांभाळणारे जय पवार मात्र लग्नामुळे निवडणुकीच्या प्रचारात कुठेच दिसत नाहीत. तर त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार देखील प्रचाराचा रणधुमाळी दिसत नाहीत. अजित पवार मात्र निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला उतरल्याचे पाहायला मिळतात, ते राज्यभर प्रचार दौरे करत आहेत. मात्र, पवार कुटुंबात लगीन घाई सुरू असताना अजित पवारांना कौटुंबीक आणि राजकीय जबाबदारी पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागते का? असेही अनेकांना वाटत आहे.

दरम्यान, राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायता निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे, वरिष्ठ नेतेमंडळी, स्टार प्रचारक नगरपालिका क्षेत्रात जाऊन प्रचार करत आहेत. त्यामध्ये, अजित पवारांकडून लाडकी बहीण आणि निधी वाटपाचा उल्लेख करत मतदारांना आकर्षित केले जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अद्याप प्रचारात अधिक सक्रीय दिसत नाहीत.

हेही वाचा

धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

आणखी वाचा

Comments are closed.