साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचाच दणका, पॅनलचे सर्वच उमदेवार आघाडीवर, लवकरच गुलाल उधळणार
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचे निर्देश दिल्यामुळे राज्यात लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजू शकतो. राजकीय पक्षांकडून या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू असताना बारामतीमधील साखर कारखान्याच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे स्वत: निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीच्या (Baramati) मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. येथील निवडणुकासाठी रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली होती. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत त्यांच्या गप्पा गोष्टीही महाराष्ट्राने या निवडणुकांच्या निमित्ताने पाहिल्या. आता, या निवडणुकांच्या (Election) निकालाचे कल हाती येत असून अजित पवारांच्या नेतृत्वाताली पॅनलचे सर्वच उमेदवार आगाडीवर असल्याची माहिती प्रचारप्रमुख किरण गुजर यांनी दिली आहे. त्यामुळे, अजित पवार गटाच्या खांद्यावरच या निवडणुकांचा गुलाल पडणार असल्याचे दिसून येते.
अवघ्या महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जय भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती प्रचार प्रमुख किरण गुजर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया बॅलट पेपरवरती असल्याने मतमोजणीस विलंब होत आहे. मात्र, सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व कल हाती येतील. तर रात्री 10 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल, असेही किरण गुजर यांनी सांगितले. सभासदांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज वाचक यांच्यावरती विश्वास दाखवत पॅनल टू पॅनल मतदान केल्याचेही किरण गुजर यांनी सांगितले.
मतदान केंद्रावर अजित पवार-हर्षवर्धन पाटलांची जुगलबंदी
अजित पवार यांनी रविवारी बारामतीमध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी मतदान केंद्रावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली. या भेटीत अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्या संवादातून मिश्किल टोलेबाजी झाल्याचे बघायला मिळाले. मतदानासाठी एकाच वेळी केंद्रावर पोहोचल्यानंतर अजित पवार म्हणाले, नमस्ते हर्षवर्धन पाटील साहेब… आम्ही संस्थेवर आहोत, मला माहितीच नाही. तर, हर्षवर्धन पाटील म्हणाले, शिक्के नीट मारले का? काही चुकलं नाही ना? असा प्रश्न विचारला. यावेळी दोघांनी मुक्तपणे संवाद साधला, दोघांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं. बारामती आणि इंदापूरच्या कार्यक्षेत्रात हा कारखाना आहे. या कारखान्याचा मी प्रतिनिधी आहे. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे दोघेही या कारखान्याचे प्रतिनिधी आहेत.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.