मूलबाळ होत नसल्याने सल्ला घेतला, नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीला आणलं; अन्…

चिम न्यूज: अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय .मूलबाळ होत नसलेल्या एका महिलेने इंस्टाग्राम फेसबुकवरून मैत्री करत एका दांपत्याचा सल्ला घेतला . बार्शीटाकळीच्या आसरा देवीला नवस केल्यानंतर दुसरा नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीत गेलेल्या महिलेला  लॉजवर थांबवत एका नराधमाने महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय . (sexual Assault) दाम्पत्याच्या सहाय्याने हा सगळा प्रकार घडला . लैंगिक अत्याचार करून महिलेला पुण्यात सोडून देण्यात आले .या घटनेनंतर पीडित महिलेने अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगत तक्रार दिली . पोलिसांनी आरोपी सुरेश पाचपोरसह बुलढाणा जिल्ह्यातील नागेश हिवराळे आणि ज्योती हिवराळे या दांपत्यालाही अटक केली आहे . (Akola crime news)

नक्की घडले काय ?

इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून झालेली ओळख अकोल्यातील एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. मुलबाळ न झाल्याने चिंता वाढलेल्या महिलेने बुलढाणा जिल्ह्यातील नागेश आणि ज्योती हिवराळे या दांपत्याचा सल्ला घेतला. मात्र, त्यांच्या ‘नवसाचे’ सल्ले आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली या महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. दांपत्याने महिलेला अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील आसरा देवीच्या दर्शनाला जाऊन नवस करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दुसऱ्या नवसासाठी तिला आळंदीला नेण्यात आले. दाम्पत्याच्या सहाय्याने सुपेश पाचपोर नावाच्या नराधमाने महिलेच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळून तिला बेशुद्ध केलं आणि नंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर पीडित महिलेला पुणे येथे सोडून दिलं. घडलेला प्रकार लक्षात आल्यावर पीडितेने धाडस करून अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सुपेश पाचपोर याच्यासह नागेश आणि ज्योती हिवराळे या दांपत्याला अटक केली असल्याचं बार्शीटाकळीचे ठाणेदार दीपक वारे यांनी सांगितलं.

हेही वाचा:

Pune Crime News: मागून येऊन तोंड दाबलं, गळा दाबत मागे नेऊन लैंगिक अत्याचार केला अन्…, पोलिसांकडून चाकण अत्याचाराबाबत नवी अपडेट

अधिक पाहा..

Comments are closed.