ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त

अकोला क्राईम न्यूज : आता महाराष्ट्रात देखील झॉम्बी ड्रग्ज संदर्भात धक्कादायक प्रकरणे उजेडात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात नागरिकांमध्ये भीतीचे पसरले वातावरण पसरले आहे. अशातच अकोल्यात ‘ड्रग्ज’ची पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 68.43 ग्रॅम ‘ड्रग्ज’चं जप्त केलं आहे. ज्याची किंमत 13 लाख 80 हजार इतकी आहे.

अकोल्यातीलं सिव्हिल लाईन हद्दीतील नवीन बस स्थानकाच्या  पाठीमागे एक व्यक्ती ‘ड्रग्ज’ विक्रीसाठी आला होता. मोहम्मद शफीक मोहम्मद जहीर शेख असं या व्यक्तीच नाव आहे. तो मुळ ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला ताब्यात घेत 68.43 ग्रॅम ‘ड्रग्ज’ जप्त करण्यात आलं आहे. एकत्रित 13 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘ड्रग्ज’ विक्रीसंदर्भातील आतापर्यंत अकोला पोलिसांची सर्वात मोठी कारवाई. ‘ड्रग्ज’ विक्रीसंदर्भातील मुख्य टोळीचा अकोला पोलिसांकडून होणार लवकर पर्दाफाश करण्यात आला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.