मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात, धंगेकरांनी केलेल्या आरोपांची चौकशी कर


Ambadas Danve on Murlidhar Mohol: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) सातत्याने चर्चेत आहेत. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीदेखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

Ambadas Danve on Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ सत्तेचा वापर करताय

अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, धंगेकर जे बोलले त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी भाजपवर टीका केली होती. मुरलीधर मोहोळ हे केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात. जैन समाजाचा हॉस्टेल आहे. त्यात एक बिल्डर आणि त्यामागे मोहोळ असल्याचे समोर आले आहे. धंगेकर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.

Ambadas Danve on Delhi Taj Hotel Controversy: तर महाराष्ट्राच्या मुलींनीही कोल्हापूरी चप्पल घालून जायला पाहिजे

दिल्लीतील ताजमहाल हॉटेलमध्ये ‘युअरस्टोरी’च्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मी कोल्हापुरी चप्पल घालते त्या मी माझ्या कष्टाच्या पैशांनी घेतलेल्या आहेत आणि इथे आले आहे, पण इथं स्टाफने मला पाय खाली ठेवून बसा, असं सांगितल्याचे म्हणत श्रद्धा शर्मा यांनी आपला संताप व्यक्त केला. याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, हे चूक आहे, ती महाराष्ट्राची मुलगी आहे. ती कुठे बसली माहीत नाही, पण कोल्हापूर चप्पलची कॉपी एक कंपनीने केली होती, आपली एक मुलगी महाराष्ट्र संस्कृती दाखवत असेल आणि तिने असे केले असेल तर महाराष्ट्राच्या मुलींनी देखील अशा ठिकाणी कोल्हापूर चप्पल घालून जायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

Ambadas Danve on Mahesh Kothare: कोठारे चांगले कलाकार, पण…

महेश कोठारे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे परिसरात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेले एक वक्तव्य प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. भाजप म्हणजे आपले घर आहे. मी स्वत: भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून आणायचा आहे. तसेच यावेळी महापौरही इथून निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, असे त्यांनी म्हटले होते. याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, त्यांच्या स्टेजवर जाऊन लोणी लावून घेणं ही पद्धत आता झाली आहे. कोठारे हे चांगले कलाकार आहेत. पण, ते राजकीय पक्षाचे पाठबळ करत असतील तर लोक त्यांना तसेच पाहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आणखी वाचा

Sanjay Raut on Congress: आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता! काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर संजय राऊतांचा ‘रोखठोक’ टोला, बिहारचाही आरसा दाखवला

आणखी वाचा

Comments are closed.