अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; एकनाथ शिंदेंनी मार्ग काढला, गृहमंत्री गुजरातला रवाना
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबईबाई). दौऱ्यावर आले असता राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांची चर्चा झाली. त्यानंतर, मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन ते मुंबईतून गुजरातच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील आपला दोन दिवसीय दौरा आटोपल्यानंतर ते आज गुजरातला जाण्यासाठी निघाले असता, त्यांच्या सरकारी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उपमुख्यमंत्री एकेनाथ शिंडे (एकनाथ शिंदे) यांचे विमान घेऊन ते गुजरातला गेले आहेत. अमित शाह यांच्या विमानात बिघाड असल्याचे समजताच एकनाथ शिंदेंनी आपले विमान शाह कुटुंबीयांसाठी देऊ केले. त्यानंतर, गृहमंत्री शाह हे एकनाथ शिंदेंच्या विमानाने गुजरातला रवाना झाले.
आपला मुंबई दौरा पूर्ण केल्यानंतर अमित शाह मुंबई विमानतळावर आले असता, त्यांच्या सरकारी विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यासाठी दुसरे चार्टर्ड प्लेन विमानतळावर उभे होते. त्यामुळे, अमित शाह यांच्या विमानातील बिघाडाची माहिती मिळताच, आपले विमान घेऊन अमित शाहांनी गुजरातला जावे, अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार, एकनाथ शिंदेंचे विमान घेऊन अमित शाह गुजरातला रवाना झाले. दरम्यान, अमित शाह यांनी सहकुटुंब मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, यावेळी गृहमंत्र्यांनी आपल्या कडेवर घेतलेल्या नातवाला पाहून अनेकांनी आजोबा-नातवाच्या नात्याची प्रेमळ झलक पाहिली.
गृहमंत्र्यांची आंदोलकांकडे पाठ – राऊत
गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर विविध ठिकाणी गणेश उत्सवात सहभागी झाले आहेत. छान, ऐन गणपतीच्या काळात लाखो मराठी बांधव त्यांच्या मागण्यांसाठी पाऊस-चिखलात आंदोलन करीत आहेत. गृहमंत्री या जनता रुपी पांडुरंगाच्या भेटीला गेले असते तर बरे झाले असते, पण ते गेले नाहीत असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांनी मराठा आंदोलकांकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन अमित शाहांवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदेंनी जे लिहून दिलं ते पूर्ण केलं – पाटील
एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही. जे लिहून दिलं होतं त्याच्याआधारे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत, असे म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाबद्दल काय झालं हे एकनाथ शिंदे यांनाच विचारा, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिली होती. आता, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही. जे लिहून दिलं होतं त्याच्या आधारे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत, असे पाटील यांनी म्हटले. तसेच, मराठा आरक्षणाच्या विषयावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर जे जे तोडगे काढता आले ते काढण्यात आले. पण नाइलाजला कोणताच इलाज नसतो असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलय.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.