राहुल सोलापूरकरांना दिलेली क्लीन चीट देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखीच; अमोल मिटकरी पुणे पोलीस आयुक्

अमोल मिटकरी: राहुल सोलापूरकरांच्या (Rahul Solapurkar) वक्तव्यांमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्याचे विधान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी केले होते. अमितेश कुमार यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलीये. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी साहित्य संमेलनाला दलालांचे संमेलन, असे  संबोधले होते. यावरून अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. तर लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमोल मिटकरी यांनी आज गुरुवारी (दि. 13) अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावर राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यांमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्याचे विधान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले होते. याबाबत अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, अमितेश कुमार यांनी एक प्रकारे राहुल सोलापूरकर यांना दिलेली क्लीन चीट ही देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखीच असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अमितेश कुमार यांची तक्रार राज्याची उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडे करणार असल्याचं ते म्हणालेत. अमितेश कुमार यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसेल. तो माहीत करून घेण्यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके पाठवणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे.

लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत मोठी इनकमिंग पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांनी याबाबत देखील भाष्य केले आहे. लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचं ते म्हणालेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार आणि आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा करत राष्ट्रवादीत कोणत्या मोठ्या नेत्यांचं इनमिंग होणार आहे हे लवकरच महाराष्ट्राला दिसणार, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

अमोल मिटकरींचा संजय राऊतांवर पलटवार

मंगळवारी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र, या पुरस्काराने राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता यावरून अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय. संजय राऊतासारख्या पत्रकाराने साहित्य संमेलन आणि साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=L1B4KUQ58CQ

आणखी वाचा

Operation Tiger: ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी जेवले, एकजण एकनाथरावांच्या सत्काराला, ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याचे संकेत?

अधिक पाहा..

Comments are closed.