अंगक्रिश रघुवंशीला अंपायरशी पंगा घेणं पडलं महागात; BCCI ने सुनावला मोठा निकाल! क्रिकेटच्या मैदा
KKR विरुद्ध LSG IPL 2026 विरुद्ध अंगकृष्ण रघुवंशी यांना दंड : आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) 26 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (KKR vs LSG) यांच्यात सामना खेळवण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. दरम्यान, कोलकाता आणि लखनऊच्या या सामन्यात कोलकाताचा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीच्या (Angkrish Raghuvanshi Run Out) विकेटची चर्चा रंगली आहे.
अंगक्रिश रघुवंशीसोबत नेमकं काय घडलं? (Angkrish Raghuvanshi KKR vs LSG IPL 2026)
अंगक्रिश रघुवंशीच्या बाद होण्यावरून एक मोठा वाद निर्माण झाला आहे. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्न केलेल्या अंगक्रिश रघुवंशीला (Angkrish Raghuvanshi) नॉन स्ट्राइकवरील कॅमरुन ग्रीनने माघारी पाठवले. पुन्हा माघारी धावताना अंगक्रिश रघुवंशीने सूर मारली. यावेळी मोहम्मद शमीने यष्टीरक्षकाच्या दिशेने मारलेला चेंडू अंगक्रिश रघुवंशीला लागला. यावर लखनौचा यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि गोलंदाज मोहम्मद शमीने अंपायरकडे दाद मागितली आणि अंगक्रिश रघुवंशीला Obstructing The Field या नियामनूसार बाद देण्याचा निर्णय जाहीर झाला. अंगक्रिश रघुवंशीला बाद देताच मैदानात राडा पाहायला मिळाला. केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर आणि अंपायरमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
या निर्णयानंतर तो संतापला आणि त्याने बॅटने बाउंड्री कुशनवर मारली. एवढंच नाही, तर त्याने आपला हेल्मेटही रागाच्या भरात डगआउटकडे फेकला. हे कृत्य आयपीएलच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे.
𝐖𝐇𝐀𝐓 𝐉𝐔𝐒𝐓 𝐇𝐀𝐏𝐏𝐄𝐍𝐄𝐃?! 😳
मिसळणे. लांब वळण. थर्ड अंपायर ड्रामा… आणि रघुवंशीला मैदानात अडथळा आणल्याबद्दल आऊट दिला गेला! 👀
TATA IPL मध्ये मैदानात अडथळा आणल्याबद्दल फलंदाजाला बाद केल्याची ही फक्त 4️⃣वी घटना आहे 🤯#TATAIPL २०२६ ➡️ #LSGvKKR | आता थेट… pic.twitter.com/WRgr608Odb
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 26 एप्रिल 2026
आयपीएलकडून कारवाई
आयपीएलकडून जारी निवेदनात म्हटलं आहे की, रघुवंशीवर लेव्हल-1 उल्लंघनासाठी 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. त्याने आर्टिकल 2.2 चं उल्लंघन केलं, जे मैदानावरील उपकरणांच्या गैरवापराशी संबंधित आहे.
चूक मान्य, पण चर्चा कायम
रघुवंशीने आपली चूक मान्य केली असून मॅच रेफरीचा निर्णय स्वीकारला आहे. आयपीएलच्या नियमानुसार, लेव्हल-1 प्रकरणात मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो. जरी केकेआरने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला असला, तरी रघुवंशीच्या या वर्तनामुळे त्याच्यावर टीका होत आहे. युवा खेळाडूकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसते, आणि त्यामुळे संघाच्या प्रतिमेलाही धक्का बसू शकतो.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.