महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त भगवा आणि हिरवा दोनच रंग ठेवायचे, ओवेसींनी नेमकं काय हवंय?
कोल्हापूरमधील assudin OWSI: एका बाजूला अतिवृष्टी आणि पुरानं शेतकरी हैराण असतानाच कोल्हापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या करमाडमध्ये निर्माण झालेल्या वादानंतर असदुद्दीन ओवेसी (Assdudin Owaisi) यांनी कोल्हापूरचा (Kolhapur News) दौरा केला. ते पुढे या दोन जिल्ह्यातही आवर्जून जातीलच. या निमित्ताने महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ‘एमआयएम’ला (MIM) नक्की काय साधायचे आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
कोल्हापूर आणि अहिल्यानगरमधील दौऱ्यामुळे असदुद्दीन ओवेसी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी राज्यात नव्याने पेटलेल्या आय लव्ह मोहम्मद (I Love Mohmhamd) वादात उडी घेतली आहे. तर अहिल्यानगरमधील हिंदू मुस्लिम तणावानंतर ओवेसींचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला महाराष्ट्राने तुलनेने अधिक दिलं. ‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या घोषणेनंतर एकगठ्ठा मतदान मिळविण्यात यश आलेल्या भाजपला राजकारणात ओवीसी यांचा उपयोग होतोच. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात आलेला आलेल्या ओवेसींचा डोळा राज्यातील काही मुस्लिम बहुल भागात असेल हे नक्कीच. शहरी भागातील मुस्लिम मतांचा गठ्ठा एकत्रित करणे हे त्यांचे पूर्वीपासून लक्ष होतेच. त्यासाठी हव्या त्या पद्धतीने युक्तीवाद करणारे ओवेसी मराठवाड्यात तर भावनिक भाषण करतात.
या राजकारणाला आधार घेण्यासाठी त्यांनी पूर्वी ‘आलमगीर की भूमी एक अजीब सा सुकून है’ असंही म्हटलं होतं. अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरातील जुन्या ‘औरंगाबाद’ नावाचा पूल त्यांना उभा करायचा असावा असं म्हटलं जात आहे. यातून ते मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करतील. मुस्लिम मतपेढीच्या आधारे शहरी भागातील महापालिकांच्या निवडणुकीवर ‘ एमआयएम’ चा डोळा असेल, हे लख्खपणे दिसते आहे. निवडणुकीच्या राजकारणात भगवा आणि हिरवा हे दोनच रंग रहावेत, अशी ‘एमआयएम’ची भूमिका पूर्वीही होती आणि पुढेही राहील.
MIM in Maharashtra: महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमचा प्रवेश नक्कीच झाला तरी कसा?
महाराष्ट्रात एक खासदार दोन आमदार असलेल्या एमआयएमचे सध्या महाराष्ट्रात धुळे आणि मालेगाव या दोन मतदार संघात आमदार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये साधारणत: 27 ते 28 नगरसेवक आपल्याच पक्षाचे असावेत, मालेगाव, धुळे, सोलापूर, नांदेड येथेही आपली ताकद वाढती ठेवण्यावर एमआयएमने भर दिला होता. बीड ,सारख्या नगरपालिकेमध्येही गेल्या निवडणुकीमध्ये ‘ एमआयएम’ चा प्रभाव दिसून आला होता. नांदेड, सोलापूरमुंबई, पुणे या महानगरपालिकेतही एमआयएमचे नगरसेवक निवडून आले.निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मतांच्या आधारे महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत आपला दबावगट कायम ठेवण्यासाठी ओवेसी सध्या प्रयत्न करतील, असे चित्र आहे.
जिथे हिंदू – मुस्लिम वादाची ठिणगी पडेल तिथे ओवेसी जातील. मुस्लिम मतांच्या केंद्रीकरणाचे राजकारण हाच ओवेसी यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. ऐन अतिवृष्टीच्या संकटातही तोच आधार बनवून त्यांचे होणारे दौरे मूळ मुद्दयांना बगल देण्यासाठी आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.
देशातील सध्याची स्थिती पाहता केवळ भाजप NDA आघाडीचा बोलबाला आहे. त्यात धर्मनिरपेक्ष मतांचे एकत्रीकरण करण्यात काँग्रेस आणि त्यांच्यासोबतची आघाडी यशस्वी ठरली नाही. तेच एमआयएमचे ओबीसी यांनी हे केलेले दिसते. त्यामुळेच ते धार्मिक मतांचे एकत्रिकरण करून आपल्या पदरात पाडून घेण्याचे डाव रचले जात आहेत. आता सध्या मैदान अनुकूल आहे आणि त्या अनुकूलतेचा फायदा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओबीसी हे घेताना दिसत आहेत आणि त्याची सुरुवात आता महाराष्ट्रामध्ये अधिक आक्रमकपणे करताना दिसतील.
https://www.youtube.com/watch?v=8sknlnmb_ko
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.