Asian Games 2026 – आज पदकांचा ‘पंच’ मारण्यासाठी हिंदुस्थान सज्ज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तिसऱ्या दिवसाअखेर हिंदुस्थानच्या खात्यात केवळ एक सुवर्णपदक आले असले तरी चौथा दिवस पदकांच्या दृष्टीने कमालीचा महत्त्वाचा ठरणार आहे. मीराबाई चानूचे वेटलिफ्टिंग, नेमबाजी, रोइंग, बॅडमिंटन, कबड्डी आणि हॉकी अशा अनेक मैदानांवर हिंदुस्थानी खेळाडू पदकासाठी झुंजणार आहेत. चौथा दिवस हिंदुस्थानसाठी किमान सात पदके निश्चित करणारा दिवस ठरू शकतो.

चौथ्या दिवशी सर्वांच्या नजरा अर्थातच मीराबाई चानूवर असतील. महिलांच्या 49 किलो वेटलिफ्टिंगमध्ये ती आशियाई क्रीडा स्पर्धेतील हरवलेले पदक मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये मनू भाकर, ईशा सिंग आणि सुरुची फोगाट पात्रता फेरीत उतरतील आणि अंतिम फेरी गाठल्यास पदकाची थेट संधी असेल.

रोइंगमध्ये हिंदुस्थानी नौकांना अंतिम फेरीत पदकासाठी जोर लावायचा आहे. बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखाली महिला संघ, तर लक्ष्य सेनच्या नेतृत्वाखाली पुरुष संघ उपांत्य फेरीत धडक देण्याच्या तयारीत आहे.

कबड्डीत पुरुषांचा बांगलादेशविरुद्ध आणि महिलांचा इराणविरुद्ध सामना, तर महिला हॉकीमध्ये थायलंडविरुद्धची लढत रंगणार आहे. सेपाक टकरॉ, जलतरण, नौकायन, तलवारबाजी, सॉफ्ट टेनिस, अश्वारोहण आणि ई-स्पोर्ट्समध्येही हिंदुस्थानी खेळाडू मैदानात असतील. त्यामुळे चौथा दिवस पदक तालिकेत लांब उडी मारण्याचा दिवस ठरू शकतो.

Comments are closed.