आधी पार्टी, 250 च्या स्पीडने पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या चिंधड्या

ठाणे : बदलापूरमध्ये भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून वाढदिवसाची पार्टी साजरी केल्यानंतर लाँग ड्राईव्हला गेलेल्या तरुणांच्या BMW कारला नव्याने उभारण्यात येणाऱ्या बडोदा-जेएनपीटी महामार्गावर (Badlapaur) धडक बसली. केवळ दोन आसनांची क्षमता असलेल्या स्पोर्ट्स कारमध्ये तिघेजण प्रवास करत होते. कारचा वेग इतका प्रचंड होता की, डिव्हायडरला झालेल्या धडकेत कारमधील तरुण आणि तरुणीचे मृतदेह छिन्नविच्छिन्न होऊन रस्त्यावर पडले होते. दरम्यान, कारचा (car) स्पीड 250 किमी प्रति तास इतका लाईव्ह व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतानाच हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय.

रस्त्यावर समोर दिसणारा कारचा चेंदामेंदा आणि विखुरलेले अवशेषच अपघाताची दाहकता सांगतात. वाढदिवसाचा आनंद क्षणात कसा काळ बनून आला, याचं हे थरकाप उडवणारं वास्तव. बदलापूरमध्ये योगेश नेगी या तरुणाचा वाढदिवस साजरा झाला. पार्टी रंगात आली. या पार्टीसाठी योगेशची मैत्रीण रेबिका जेकब खास मुंबईच्या वांद्रे वरून बदलापूरला आली होती. पार्टी संपली आणि मित्राची महागडी ‘BMW Z4’ कार घेऊन हे तिघे जण लाँग ड्राईव्हसाठी निघाले. पण, हा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. अंगद गिल याच्या मालकीची ही BMW कार केवळ 2 आसनांची आहे. कंपनीने यात चालक आणि शेजारी एक अशा दोनच सीट दिल्या आहेत. मात्र, गाडीत तिघेजण असल्याने वाढदिवस असलेला योगेश आणि त्याची मैत्रीण रेबिका हे एकाच सीटवर दाटीवाटीने बसले. अंगद कार किती वेगाने चालवतोय, याचा व्हिडिओ योगेश स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. कार हवेच्या वेगाने धावत होती, आणि अचानक समोर रस्ता बंद असल्याचा डिव्हायडर आला. स्पीड कमी करेपर्यंत काळानं घाला घातला आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. धडक एवढी भीषण होती की योगेश आणि रेबिका कारमधून थेट बाहेर फेकले गेले आणि दोघांचेही मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले.

पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास नियंत्रण कक्षाकडून बडोदा-पनवेल हायवेवर अपघात झाल्याचा कॉल आम्हाला मिळाला. आमचे बिट मार्शल जिरे आणि सोनवणे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तिथे MH 05 FS 6675 या BMW कारचा भीषण अपघात झालेला होता. रस्त्यावर एका महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आला, तर चालक अंगद गिल हा गंभीर जखमी होता. आम्ही जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवलं असून, मोबाईलमधील व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

प्रशासन जबाबदारी कशी काय झटकू शकतं?

दरम्यान, रस्ते विकास महामंडळाच्या बेजबाबदार कारभाराचे धिंडवडे म्हणजे हा महामार्ग, कारण अजूनही हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही. मग तरीही इथे गाड्या कशा काय जात आहेत? केवळ ‘आमची जबाबदारी नाही’ असा फलक लावून प्रशासन आपली जबाबदारी कशी काय झटकू शकतं? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा

सहाच नाही आणखी खासदार होते, पण…; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं

Comments are closed.