बीएआरसीला हायकोर्टाचा झटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जातप्रमाणपत्र जमा न केल्याचा ठपका ठेवत प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याला तडकाफडकी सेवा समाप्तीची नोटीस बजावणाऱ्या बीएआरसीला मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. याचिकाकर्त्याने संस्थेला आवश्यक असलेले जातप्रमाणपत्र यापूर्वीच जमा केले असल्याचा दावा मान्य करत न्यायालयाने बीएआरसीला तूर्तास कारवाई न करण्याचे आदेश देत सेवा समाप्तीच्या नोटिसीला अंतरिम स्थगिती दिली आहे. अमित कुमार हे बीएआरसी येथे ट्रेनी म्हणून गेल्या 18 महिन्यांपासून काम करत असून जातप्रमाणपत्र जमा न केल्याचा ठपका ठेवत बीएआरसीने त्यांना 22 मे रोजी नोटीस बजावत सेवा समाप्तीचे आदेश दिले.

Comments are closed.