वाल्मिक कराडच्या राईट हँडवरील मकोका रद्द होताच अंजली दमानिया संतापल्या; म्हणाल्या, गोट्या गित्त
बीड गुन्हा: बीड जिल्ह्यातील परळी (Parli) तालुक्यातील तडोळी येथील शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर झालेल्या खुनाच्या प्रयत्न आणि लुटीच्या प्रकरणात कारवाई झालेल्या रघुनाथ फड गँग प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, यापैकी पाच आरोपींवरील मकोका अपर पोलिस महासंचालकांनी रद्द केले आहेत. वाल्मिक कराडचा (Walmik Karad) राईट हँड म्हणून ओळख असणारा नंदगौळ येथील रहिवासी गोट्या गित्ते (Gotya Gitte), जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते या सर्व आरोपींवरील मकोका रद्द करण्यात आला आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी संताप व्यक्त केलाय.
अंजली दमानिया म्हणाल्या की, गोट्या गित्ते नावाच्या माणसावर परळी, केज, पुणे, लातूर, परभणी येथे तब्बल 16 गुन्हे दाखल असताना तो इतका भयानक माणूस असताना देखील त्याचं नाव मकोका मधून वगळण्यात आले आहे. ते का वगळण्यात आले आहे? याचे उत्तर डीजी कार्यालयाने द्यायलाच हवे. कारण अशा माणसांनी उद्या जाऊन आणखी भयानक प्रकार केले त्याला जबाबदार कोण? डीजी मॅडम त्याला जबाबदार असणार का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
नेमकं काय आहे प्रकरण?
18 ऑक्टोबर 2023 रोजी परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तडोळी येथील शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांना लोखंडी रॉड, फरशी व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर त्यांच्या खिशातील 2 लाख 70 हजार रुपये लंपास करण्यात आले, शिवाय शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.
पाच जणांवरील मकोका रद्द
या प्रकरणात वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गिते, तसेच जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गिते या पाच जणांवरचा मकोका आता रद्द करण्यात आला आहे. मात्र टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि त्याचा सहकारी धनराज उर्फ राजाभाऊ फड याच्यावर मकोका कायम ठेवण्यात आला आहे.
गोट्या गिते अद्याप फरार
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गोट्या गिते अजूनही फरार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असूनही त्याच्यावरची मकोका कारवाई मागे घेतल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=exptredsu9u
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.