भिवंडीत चिकन शोरमा खाल्ल्याने 14 जणांना विषबाधा, आरोग्य विभागाच्या तातडीने हालचाली, घटनास्थळी प

चिकन शावरमा भिवंडी: भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील 6 व इतर असे एकूण 14 जणांना अन्नातून विषबाधा (अन्न विषबाधा) झाल्याची घटना घडली आहे. या सर्व रुग्णांना उपचारासाठी भिवंडी (Bhiwandi)  उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकांनी शहरातील खंडू पाडा परिसरात एका फेमस शोरमा नावाच्या दुकानातून चिकन शोरमा, पिझ्झा खरेदी करून काल रात्री घरी नेऊन खाल्ले होते. त्यानंतर आज सकाळपासूनच काही जणांना अस्वस्थ वाटू लागले. दुपारपर्यंत त्रास वाढल्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या व्यक्तींना उलट्या, पोटदुखी, मळमळ, जुलाब आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली होती. रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले आहे. (Bhiwandi अन्न विषबाधा)

Bhiwandi Food Poisoning : आरोग्य विभागाकडून तपास सुरू. अन्न औषध विभागाच्या वतीने छापेमारी

दरम्यानया घटनेतील रुग्णांमध्ये 6 पुरुष, 6 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अन्न विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या शांतिनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. सध्या या फेमस सोरमा दुकानावर अन्न औषध (फूड) विभागाच्या वतीने छापेमारी करण्यात आली असून सर्व साहित्यांची चौकशी केली जात आहे . या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सर्व खाद्यपदार्थ व त्यांचे पॅकेजिंग यांची देखील चौकशी केली जात आहे.

दरम्यानउपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सफीक अन्सारी (३८), रुबीना बानो (३२), मरियम अन्सारी (११), अर्शिया अन्सारी (३), अरबाज अन्सारी (२७), शहाबाज अन्सारी (२६), जिनत अन्सारी (२४), आसिफ सय्यद (३०), नाजमीन सय्यद (२६), अन्वर सय्यद (३३), अफसाना सय्यद (५५), सना सय्यद (२५), तबसुम अन्सारी (२३) आणि अब्बास सय्यद (५) यांचा समावेश आहे.

अन्न नागरी पुरवठा विभागाच्या कारवाईचा धडाका सुरूच, विभागनिहाय कारवाई (FDA Action News)

मुंबई

13 आस्थापनांची तपासणी

8 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले

₹1,00,417 चा माल जप्त

8 जणांना अटक

5 आस्थापना सील

कोकण

1 आस्थापनेवर कारवाई

₹1,32,970 चा माल जप्त

1 जण अटक

पुणे

1 आस्थापनेवर कारवाई

₹2,565 चा माल जप्त

1 जण अटक

1 आस्थापना सील

नाशिक

₹1,64,434 चा माल जप्त

1 जण अटक

1 वाहन जप्त

छत्रपती संभाजीनगर

2 आस्थापनांवर कारवाई

₹1,24,080 चा माल जप्त

3 जण अटक

1 आस्थापना सील

1 वाहन जप्त

नागपूर

₹1,91,445 चा माल जप्त

1 जण अटक

1 वाहन जप्त

अमरावती

2 आस्थापनांवर कारवाई

₹27,206 चा माल जप्त

2 जण अटक

FDA Action News: एकूण कारवाई

21 आस्थापनांची तपासणी

16 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले

₹7,43,117 चा माल जप्त

17 जणांना अटक

12 एफआयआर दाखल

7 आस्थापना सील

3 वाहने जप्त

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.