कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण ठाम

मुंबई : महायुती म्हणून आम्ही राज्यातील महापालिका निवडणुका (Election) एकत्र लढणार आहोत, केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती नसेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती एकत्र निवडणुकांना सामोरे जाईल असेच चित्र आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसी (KDMC) निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेसंदेभात केलेल्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) ठाम आहेत. त्यामुळे, कल्याण डोंबिवलीत भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांबाबतचं विधान हे विचारपूर्वक केलेलं वक्तव्य असून अर्थ काय काढावा हा तुमचा प्रश्न आहे, असे रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांना उद्देशून म्हटले. कल्याण डोंबिवलीतल्या 10-10 हजार कार्यकर्त्यांमधून केवळ 122 कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचं वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केलं होत. त्यामुळे, कल्याण डोंबिवलीत भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीत विश्वासाने मतदान करता. यावेळेस फक्त एवढीच विनंती आहे की, जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा. कामे मार्गी लावण्यासाठी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेत भाजपचे सरकार आले तर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लावता येतील. आपल्याला 100 टक्के एका विचाराचे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे सरकार जे केंद्रात आणि राज्यात आहे तेच आणायचे आहे, असेही रविंद्र चव्हाण यांनी नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर बोलताना म्हटले. त्यामुळे, केडीएमसी निवडणुकीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

अंबरनाथ-बदलापूरमध्ये भाजपचं कमळ

नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ग्रामीण महाराष्ट्रात भाजपच्या तोडीस तोड केलेली कामगिरी निकालाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मात्र, त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्याला लागून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत येथील सत्ता हस्तगत केली. बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदेतील शिवसेनेचा पराभव हा एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा झटका ठरला आहे. त्यामुळेच, आता कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही भाजपकडून स्वबळाचे संकेत दिले जात आहेत. त्यासाठी, रविंद्र चव्हाण आग्रही असल्याचं त्यांच्या वक्तव्यांवरुन दिसून येते.

हेही वाचा

नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

आणखी वाचा

Comments are closed.