‘इन्फ्रा मॅन’वरुन भाजप-शिवसेना कोल्डवॉर; प्रकल्पांच्या कामाचं श्रेय दिलं आपल्या पक्षाच्या नेत्य
भाजप-शिवसेना शीत युद्ध: ‘इन्फ्रा मॅन’वरुन भाजप-शिवसेना कोल्डवॉर सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. ‘रिशेपिॅग मुंबई’निमित्ताने एकनाथ शिंदेंना विकास पुरुष म्हणून सतत ट्वीट करत प्रोजेक्ट करणाऱ्या शिवसेना नेत्या शायना एनसी यांना चित्रा वाघ यांनी समज दिली असल्याची माहिती आहे. चित्रा वाघ यांनी ‘महायुती धर्माच्या विरोधात भूमिका घेऊन ‘इन्फ्रा मॅन’ अभियान राबवित असेल तर ते अत्यंत दुर्दैवी’ म्हणत शायना एनसींचे कान टोचले आहेत. येत्या काही महिन्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका असल्याने शायना एनसीकडून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात झालेल्या कामांचा दाखल देत प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता.
ट्रान्सफाॅर्मिंग मुंबई पुस्तकाचे 12 जून रोजी प्रकाशन, अशातच शायना एनसींकडून वृत्तपत्रांमध्ये लेख लिहित शिंदेंकडून मुंबईसाठीचे काही प्रकल्प आपणच केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, एकेकाळी भाजपात असलेल्या शायना एनसींना चित्रा वाघ यांच्याकडून उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी ह्या प्रकल्पांसाठी घेतलेल्या मेहनतीचा विसर पडला का? असं म्हणत टोले लगावले आहेत. सोबतच, राजीनामे खिशात घेऊन फिरणार्यांच्या काळात सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी भक्कम साथ देवेंद्र फडणवीसांना दिल्याचे म्हणत चित्रा वाघ यांच्याकडून शायना एनसींना टोला लगावला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून केली जात आहे. अशातच, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईसाठी सुरु असलेल्या धारावी पुर्नविकास प्रकल्प, बीडीडी चाळ पुर्नविकास प्रकल्प, वांद्रे वर्सोवा विरार सीलिंक, विरार-अलिबाग मल्टी-मोडल कोरिडोर, मुंबई मेट्रो प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, शिवसेनेकडून श्रेय घेत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख होत नसल्याने कोल्डवाॅरची चर्चा रंगली आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी पोस्ट लिहून शायना यांना टॅग केला आहे.
नेमकं चित्रा वाघ यांचं ट्विट काय आहे?
“देशात नरेंद्र-राज्यात देवेंद्र ! हा नारा घेऊन 2014 मध्ये भक्कम बहुमत महायुतीला मिळाले. 2014 ते 2019 हे महाराष्ट्राच्या विकासाचे सुवर्णयुग होते. राज्याने कधी नव्हे, इतकी मोठी झेप विकासाच्या सर्व क्षेत्रात घेतली मग ते मुंबईचा कोस्टल रोड असेल अटलसेतू असेल किंवा 11 कि.मी. वरुन 250 कि.मी.च्या मेट्रोवर घेतलेली झेप असेल. मेट्रो-3 सारखा आयकॉनिक प्रकल्प असेल किंवा महाराष्ट्राला एक नवी उंची देणारा समृद्धी महामार्ग असेल. या प्रकल्पांच्या आखणीपासून ते नियोजनापर्यंत आणि केंद्रातून परवानग्या आणण्यापासून ते प्रत्यक्ष लोकार्पणापर्यंत कुणी मेहनत घेतली असेल तर ती निर्विवादपणे आमचे नेते मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस @Dev_Fadnavis यांनी घेतली आहे”.
“अर्थात राजीनामे खिशात घेऊन फिरणार्यांच्या काळात सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे @mieknathshinde यांनी भक्कम साथ देवेंद्रजींना दिली. सरकार ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असते. आपले मन मोठे करीत देवेंद्रजींनी एकनाथजींना संधी दिली आणि ते मुख्यमंत्री बनले पण मुंबई असो की महाराष्ट्र त्यात देवेंद्रजींचे योगदान त्यांनाही ठावूक आहे आणि तसेच त्यांनी ते वेळोवेळी सांगितलेही आहे. अशात कुणी जर महायुती धर्माच्या विरोधात भूमिका घेऊन ‘इन्फ्रा मॅन’ अभियान राबवित असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. अगदी कालपरवापर्यंत ज्या पक्षात आपण काम केले, त्याची थोडी तरी जाण आणि भान राखायला हवे. बाकी मुंबई,महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. @ShainaNC”, अशी पोस्ट चित्रा वाघ यांनी लिहली आहे.
देशात नरेंद्र-राज्यात देवेंद्र !
हा नारा घेऊन 2014 मध्ये भक्कम बहुमत महायुतीला मिळाले. 2014 ते 2019 हे महाराष्ट्राच्या विकासाचे सुवर्णयुग होते.
राज्याने कधी नव्हे, इतकी मोठी झेप विकासाच्या सर्व क्षेत्रात घेतली मग ते मुंबईचा कोस्टल रोड असेल अटलसेतू असेल किंवा 11 कि.मी. वरुन 250…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) मे 24, 2025
अधिक पाहा..
Comments are closed.