साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर 21 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार; चिमुकलीची प्रकृती चिंताजनक

बुलधाना गुन्हेगारीच्या बातम्या: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी गावातून एक खळबळजनक घटना  उजेडात आली आहे. यात 21 वर्षीय नराधमाने साडेचार वर्षीय बालिकेला गावाजवळ असलेल्या संत्राच्या मळ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले आहे. सुनील कालुसिंग निगवाले अस या नारधमाचं नाव असून तो मध्यप्रदेशातील डोईफोडिया गावाचा रहिवासी आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी गुन्हा दखल करत आरोपीला अटक (Crime News) केली आहे.  तर  पीडित बालिकेवर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात अलीकडे लैंगिक अत्याचारांच्या घटनेत सातत्याने वाढ झाल्याचे पुढे आले आहे. अशातच पुन्हा एकदा अवघ्या चार वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून, घटनेच्या निषेधार्थ शहर बंद

जत शहरामध्ये चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज (7 फेब्रुवारी) जतमध्ये सर्व समाजाकडून बंद  पुकारण्यात आलाय. या घटनेच्या निषेधार्थ दुपारी जतमध्ये एक मोर्चा देखील निघणार आहे. बालिकेच्या लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ आणि हे कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी जत  शहरामध्ये आज हा बंद पाळण्यात आलाय. जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ करजगी व जत येथे सर्व समाजाकडून बंद आणि मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले आहे.

बँकेची ‘ती’ 5 कोटींची रक्कम सुरक्षित, आरोपींची संख्या पोहचली अकरावर

गोंदिया: भंडारा जिल्ह्यातील तुमसरच्या ॲक्सिस बँकेच्या मॅनेजर आणि रोखपालाला पैशाचं प्रलोभन देत बँकेतील तब्बल 5 कोटी रुपयांची लूट करण्याचा प्रयत्न भंडारा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी हाणून पाडला होता. या प्रकरणात भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलेली पाच कोटी रुपयांची रक्कम सुरक्षेसाठी स्टेट बँकेत जमा केली आहे. तर, या प्रकरणातील आणखी एका सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीच्या जितेंद्र कुमार शर्मा याला पोलिसांनी अटक केली असून आता आरोपींची संख्या 11 वर पोहोचली आहे. गोंदियातील आशिष ट्रेडर्स आणि रोहित ट्रेडर्स या दोन व्यापाऱ्यांची नावं पोलीस चौकशीत समोर आली असून आता त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.