शिंदे म्हणाले, लोढांनी बांधली तशी घरं; फडणवीस म्हणाले, शिंदेंपेक्षा जास्त टाळ्या कोळंबकरांना, ब
Devendra Fadnavis मराठी Speech BDD Chawl: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या वतीने आज मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास (Naigaon BDD Chawl Redevelopment) प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 पुनर्वसन सदनिकांचा वितरण समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी), उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Ajit Pawar), उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha), स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे देखील उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे? (एकनाथ शिंदे भाषण बीडीडी चाळ)
चाळीत राहणारे लोक आता टॉवरमध्ये राहायला जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कामाला सुरुवात झाली. मधल्या काळात दुसरं सरकार आलं स्पीड ब्रेकर आले. नुकतीच देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट मिळाली. मी डॉक्टर नाही. मात्र 2022 ला मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक ऑपरेशन केलं. आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली. स्पीड वाढलं. सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस आले पाहिजेत हे आमच स्वप्न होतं. आमदार कालीदास कोळंबकर आहेत. सलग पाठी लागायचे. आधी मी मुख्यमंत्री होतो, आता नगरविकासमंत्रीही मीच आहे. सह्या करण्यात मी पहिल्या नंबरवर आहे. अजित पवार असं म्हणायचे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. गुढीपाडव्याला तुम्हाला आता नवीन घरात जाता येणार आहे. विश्वासचं दुसरं नाव म्हणजे म्हाडा ही ओळख आहे. मंगलप्रभात लोढा बांधतात. तशीच चांगली घरे म्हाडाने बांधली आहेत. इथे 12 वर्षे देखभाल खर्च म्हाडा करणार आहे. त्यामुळे टेन्शन फ्री राहायला जा… मुंबईतून बाहेर गेलेले पुन्हा मराठी लोकं आपल्याला मुंबईत आणायची आहेत.
लोकम म्हंटिल माझ्याकडे दुचाकी आहे, कार आहे, तुझ्याकडे काय आहे? (मराठी Speech BDD Chawl)
गुढीपाडव्याला तुम्हाला आता नवीन घरात जाता येणार आहे. विश्वासच दुसरं नाव म्हणजे म्हाडा ही ओळख आहे. लोकं म्हणतील मेरे पास टू व्हीलर है, कार है, तुम्हारे पास क्या है? आमची बीबीडी चाळीतील लोक म्हणतील, हमारे पास रिडेव्हलपमेंट में मिला हुआ टू बीएचके है…आधी लोकं विचारायची तुम्ही मुंबईत राहता पण तुमच्याकडे घर आहे का? आता तुम्ही सांगाल आमच्याकडे 2 बीएचके आहे. त्यामुळे लग्नाला काहीच अडचण येणार नाही.
फडणवीस म्हणाले, शिंदेंपेक्षा जास्त टाळ्या कोळंबकरांना- (Devendra Fadnavis On Kalidas Kolambkar)
एकनाथ शिंदे यांनी बिल्डिंग बांधली. मात्र सर्वात जास्त टाळ्या या कालिदास कोळंबकर यांनाचं मिळाल्या आहेत. हा विश्वास कालिदास कोळंबकरांनी कमावला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बीडीडी चाळीच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यावेळी लक्षात आलं की खूप जुन्या बिल्डिग होत्या.बिल्डर यायचे प्रोजेक्ट बाबत सांगायचे, चुका काढायचे यात 35 वर्षे निघून गेली. त्यामुळे मी भूमिका घेतली आणि हा प्रकल्प बिल्डर नाही तर म्हाडा करेल आणि बिल्डर म्हणून म्हाडा काम करेल आणि आज हे काम पूर्ण झालेलं आहे. देशातील सर्वोत्तम कंपन्या आपण याठिकाणी कामासाठी आणल्या. कंपन्या कामासाठी आल्या त्यानंतर अनेक अडचणी आल्या. मात्र सर्व अडचणी दूर करून आपण प्रकल्प मार्गी लावला आहे. 2029 पर्यंत 100 टक्के चाव्या आपण देणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.